Fugitive Mehul Choksi : डोमिनिका सरकार भारताचा फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला अँटिग्वा-बार्बुडाला परत पाठवणार आहे. अँटिग्वा-बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी सांगितले की, आम्हाला ही माहिती मिळाली आहे. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. Dominican government to return fugitive Mehul Choksi to Antigua
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डोमिनिका सरकार भारताचा फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला अँटिग्वा-बार्बुडाला परत पाठवणार आहे. अँटिग्वा-बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी सांगितले की, आम्हाला ही माहिती मिळाली आहे. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. दरम्यान, डोमिनिका येथील मेहुलचे वकील मार्श वेन यांनी म्हटले की, आज सकाळी पोलीस स्टेशनमध्ये मेहुलची भेट झाली. वकिलाच्या म्हणण्यानुसार, त्याचे अपहरण करून डोमिनिका येथे आणण्यात आले असा आरोप मेहुलने केला. याशिवाय मारहाणही करण्यात आली. मेहुलचे वकील या प्रकरणात सुटकेसाठी न्यायालयात अपील दाखल करत आहेत.
चोकसी नुकताच अँटिग्वा आणि बार्बुडा येथून पळून गेला होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात काढलेल्या ‘यलो नोटिशी’मुळे शेजारील देश डोमिनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. बुधवारी अँटिग्वाच्या माध्यमांमध्ये ही बातमी आली. अँटिग्वा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राउनली म्हणाले की, त्यांनी डोमिनिका सरकारला चोकसीला भारताला सोपवण्यास सांगितले आहे. मंगळवारी रात्री चोकसीच्या डोमिनिकामधील अटकेची बातमी कळताच ब्राउनी यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी चोकसीला भारतात पाठविण्याबाबत डोमिनिका प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
“आम्ही त्यांना (डोमिनिका) चोकसीला अँटिग्वा येथे न पाठवण्यास सांगितले आहे,” अँटिग्वा न्यूजने ब्राउनींच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीच्या प्रकरणात चोकसी वाँटेड आहे. या प्रकरणात त्याचा नातेवाईक नीरव मोदीवरही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे.
Dominican government to return fugitive Mehul Choksi to Antigua
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App