विशेष प्रतिनिधी
डेहराडून : रामदेवबाबा यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यात त्यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर विधान केले आहे. ‘‘त्यांचे वडीलही मला अटक करू शकत नाहीत.’’ असे विधान रामदेवबाबा यांनी आयएमएला उद्देशून केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) थेट कायदेशीर कारवाईचा इशारा मिळाल्यानंतर रामदेवबाबा चवताळले असून त्यांनी पुन्हा टीका सुरु केली आहे. त्यामुळे हा वाद वाढत जाण्याची चिन्हे आहे. Baba Ramdev targets IMA once again
ही मंडळी फक्त खळखळ करत असून त्यांना फक्त ठग रामदेव, महाठग रामदेव आणि गिरफ्तार रामदेव अशा प्रकारचे ट्रेंड तयार करता येतात.’’ असे मत त्यांनी यात मांडले आहे. सोशल मीडियावरील #Arrest Ramdev या ट्रेंडला उत्तर देण्यासाठी त्यांनी हा नवा व्हिडिओ व्हायरल केल्याचे बोलले जाते. तत्पूर्वी रामदेवबाबांच्या विधानांना आक्षेप घेताना आयएमएने त्यांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली होती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिताना त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची देखील मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App