WATCH : ओडिशाच्या पारंपरिक नृत्यावर थिरकल्या IMF प्रमुख; क्रिस्टालिना जिरयोजिवा यांना भारतीय संस्कृतीचे कौतुक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : G20 शिखर परिषदेसाठी बहुतेक पाहुणे 8 सप्टेंबर रोजी दिल्लीत पोहोचले. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा समावेश आहे. WATCH: IMF chief dances to Odisha’s traditional dance; Appreciation of Indian culture to Kristalina Jiriojiva

या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त जगातील सर्व मोठ्या संघटनांचे प्रमुखही भारतात आले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जिरयोजिवा यांच्याशिवाय जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचाही यामध्ये समावेश आहे.

IMF प्रमुख आनंदी दिसल्या

जेव्हा IMF प्रमुख क्रिस्टालिना जिरयोजिवा दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरल्या आणि येथे त्यांचे स्वागत झाले तेव्हा त्या खूप आनंदी दिसत होत्या. त्यांच्या स्वागतासाठी ओडिशातील लोककलाकार संबळपुरी तालावर नाचत होते. विशेष म्हणजे या लोककलाकारांची ही धून आणि शैली क्रिस्टालिनाला आवडली. काही वेळातच तिने नाचायला सुरुवात केली आणि काही वेळ या डान्स स्टेप्स फॉलो करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जागतिक प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्यांना टिपत होते.

WATCH: IMF chief dances to Odisha’s traditional dance; Appreciation of Indian culture to Kristalina Jiriojiva

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!