मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 ठार, 50 जखमी; तेंगनौपाल जिल्ह्यात 2 ठिकाणी गोळीबार, जमावाने सुरक्षा दलांचा मार्ग रोखला

वृत्तसंस्था

इंफाळ : मणिपूरच्या तेंगनौपल जिल्ह्यातील पैलेल येथे गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुरुवारी दोन जण ठार तर 50 जण जखमी झाले. जखमींमध्ये लष्कराच्या एका मेजरचाही समावेश आहे.Violence resumes in Manipur, 2 killed, 50 injured; Firing at 2 places in Tengnaupal district, mob blocked the way of security forces

पोलिसांनी म्हटले की, पेलेलच्या मोलनोई गावात सकाळी 6 वाजता शस्त्रे घेऊन आलेल्या लोकांच्या गट आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये एक जण जखमी झाला. त्याला तात्काळ काकचिंग येथील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोळी लागून जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीला इंफाळ प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत (RIMS) नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.



पैलेल येथे अश्रुधुराचे नळकांडे फोडले

गोळीबाराची बातमी पसरताच, कमांडोंचा गणवेश परिधान केलेल्या मीरा पॅबिस आणि आरामबाई टेंगोल मिलिशियासह मेईतेई समुदायाच्या लोकांच्या जमावाने सुरक्षा कडे तोडत पैलेलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आसाम रायफल्सच्या जवानांनी त्यांना रोखले. थांबवल्यावर जमावातील काही सशस्त्र लोकांनी, गोळीबार सुरू केला. त्यांनी पोलिसांचा गणवेश घातलेला होता. यामध्ये लष्कराचे एक मेजर गोळी लागल्याने जखमी झाले. या घटनेत अन्य तीन पोलिसही जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. क्रॉस फायरिंगमध्ये एकाचा मृत्यू झाला.

जखमी मेजरना हेलिकॉप्टरने लिमाखोंग येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम रायफल्सच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये सुमारे 45 महिला आणि काही सैनिक जखमी झाले. दुसरीकडे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंफाळहून पैलेलला जाणाऱ्या आरएएफ जवानांच्या पथकाला थौबल येथे स्थानिक लोकांनी आणि मीरा पाबीसच्या लोकांनी अडवले.

पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम

बुधवारी हजारो आंदोलक बिष्णुपूर जिल्ह्यातील फुगकचाओ इखाई येथे जमले होते. हे सर्वजण टोरबुंगमधील त्यांच्या निर्जन घरांमध्ये जाण्यासाठी लष्कराचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, जमावाने आदिवासींवर हल्ला करण्याबरोबरच त्यांच्या घरांचीही तोडफोड करायची होती.

यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मणिपूरच्या पाचही घाटी जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून राज्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Violence resumes in Manipur, 2 killed, 50 injured; Firing at 2 places in Tengnaupal district, mob blocked the way of security forces

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात