जो बायडेन भारतात दाखल, G20 शिखर परिषदेआधी मोदींसमवेत द्विपक्षीय चर्चा; भारत – अमेरिका पोर्टेबल अणुभट्ट्या करार!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन भारतात दाखल झाले आणि प्रत्यक्ष शिखर परिषद सुरू होण्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अधिकृत निवासस्थान 7, लोक कल्याण मार्ग येथे जाऊन त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान पोर्टेबल अणुभट्ट्या उत्पादनासंदर्भात करार झाला. Agreement between India and USA regarding production of portable nuclear reactors

G20 शिखर परिषदेपूर्वी भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात हे मोठे पाऊल पुढे पडले आहे. जो बायडेन नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जो बायडेन ताबडतोब 7, लोक कल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची द्विपक्षीय चर्चा सुरू केली. यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा समावेश शिष्टमंडळही होते.

सर्वसाधारणपणे भारत – अमेरिका, भारत – रशिया आणि भारत – चीन या बड्या देशांमध्ये राजधानी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस या राजनैतिक इमारतीमध्ये शिखर परिषदा होत असतात. पण यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे थेट पंतप्रधानांचे निवासस्थान 7, लोक कल्याण मार्ग येथे पोहोचले आणि तेथेच त्यांनी मोदींशी द्विपक्षीय बातचीत केली.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यातील “पॉलिटिकल केमिस्ट्री” सर्वश्रुत आहे. तीच पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी देखील दिसली. दोन्ही नेत्यांनी तिथल्या लॉबीत गप्पा मारत हास्यविनोद करत काही वेळ घालवला आणि नंतर त्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली. यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यात पोर्टेबल अणुभट्ट्या निर्मिती करार झाला.

Agreement between India and USA regarding production of portable nuclear reactors

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात