”I am a Proud Hindu”, भारतात ‘सनातन’वरून वाद सुरू असताना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे विधान!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधाबाबतही सुनक यांनी सांगितले आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात एकीकडे सनातन हिंदू धर्माबाबत दररोज विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून बेताल  विधानं केली जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशावेळी दिल्लीत उद्यापासून होत असलेल्या G20 परिषदेसाठी आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे हिंदू धर्माबाबत एक विधान समोर आलं आहे. ज्यामुळे भारतात हिंदू धर्माला नावे ठेवणाऱ्या एकप्रकारे चपराकच बसली असे म्हणावे लागले. I am a Proud Hindu British Prime Minister Rishi Sunaks statement when there is a debate on Sanatan in India

ऋषी सुनक नेहमीच हिंदू धर्माशी असलेल्या त्यांच्या संबंधाबद्दल बोलत असतात. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुनक म्हणाले की, ”मला हिंदू असल्याचा अभिमान आहे आणि माझे पालनपोषण त्याच पद्धतीने झाले आहे. आशा आहे की, माझ्या भारत भेटीदरम्यान मी मंदिरालाही भेट देऊ शकेन. नुकतेच मी आणि माझ्या भावा-बहिणींनी रक्षाबंधन साजरे केले. माझ्याकडे अजूनही सगळ्या राख्या आहेत. मात्र, यावेळी वेळेच्या कमतरतेमुळे मला जन्माष्टमी नीट साजरी करता आली नाही. पण मी मंदिरात जाऊन त्याची भरपाई नक्कीच करू शकतो.”

याशिवाय सुनक म्हणाले, ”या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मला वाटते की विश्वासामुळे प्रत्येकाचे जीवन सोपे होते, विशेषत: जेव्हा तुमची नोकरी माझ्यासारखी तणावपूर्ण असते. धार्मिक श्रद्धा तुम्हाला एक प्रकारचे बळ देते.

पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या संबंधांवर बोलताना सुनक म्हणाले की, त्यांना पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे. ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या मला खूप मानतात. भारत आणि यूके यांच्यात व्यापार करार होण्यासाठी आम्ही एकत्रितपणे खूप प्रयत्न करत आहोत, कारण आम्हा दोघांनाही वाटते की हा दोन्ही देशांसाठी चांगला करार असेल. हा व्यवहार दोन्ही देशांच्या फायद्याचा कसा आहे, याची खातरजमा करण्यात आम्ही दोघे गुंतलो आहोत.

I am a Proud Hindu British Prime Minister Rishi Sunaks statement when there is a debate on Sanatan in India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात