IPS रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट, FIR रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल दोन्ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एक एफआयआर  पुण्यात आणि दुसरी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. राज्य गुप्तचर खात्यात असताना रश्मी शुक्ला यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप होता. Clean chit to IPS Rashmi Shukla Bombay High Court order to quash FIR

विरोधी पक्षनेत्यांच्या टॅपिंगच्या या प्रकरणी ठाकरे सरकारच्या काळात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पुण्यात नाना पटोले आणि मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप असून, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पुण्याच्या प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता, तर कुलाबा प्रकरणात राज्य सरकारने पुढे जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे आज न्यायालयाने दोन्ही एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

मार्च महिन्यात सशस्त्र सीमा बलच्या संचालकपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारला ही शिफारस केली होती. नेपाळ आणि भूतान सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी एसएसबीकडे आहे. याआधी त्या महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. यावेळी 2019 मध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंगचे आरोप केले होते. दोन्ही नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र एफआयआर दाखल केले होते.

Clean chit to IPS Rashmi Shukla Bombay High Court order to quash FIR

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात