प्रतिनिधी
लखनौ : तामिळनाडूतल्या सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्यांनी सनातन धर्माविरुद्ध गरळ ओकणे सुरू ठेवले असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा अंगार दाखविला आहे. रावणाचा अहंकार आणि बाबर – औरंगजेबाच्या अत्याचारांनी जो सनातन धर्म संपला नाही, तो सनातन धर्म हे तुच्छ लोक काय संपवणार??, अशा परखड शब्दांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन आणि 2 जी घोटाळ्यातला मुख्य आरोपी ए. राजा यांना फटकारले आहे. What will that Sanatan Dharma end these petty people??; Yogi Adityanath
तामिळनाडूतल्या मंत्र्यांनी सनातन धर्माचे मलेरिया, डेंगी, कोरोना, एचआयव्ही, कुष्ठरोग अशा घृणास्पद शब्दांमध्ये वर्णन केले होते. सनातन धर्म संपविण्याची उर्मट भाषा वापरली होती.
या सर्वांना जन्माष्टमीच्या कार्यक्रमातून योगी आदित्यनाथ यांनी जबरदस्त तडाखा लावला आहे. आपला देश सकारात्मकतेच्या दिशेने पुढे जातो आहे. हे काही लोकांना बघवत नाही. सरकारने ज्या योजना आणल्या आहेत, जी कामे केली, त्यावर सनातन शब्दाचा वापर करुन सगळे काही बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र जे विरोध करत आहेत ते विसरले आहेत की रावणाचा अहंकार असो की बाबर आणि औरंगजेबाने केलेला अत्याचार असो तेव्हाही सनातन धर्म संपला नाही. तेव्हा असले तुच्छ लोक काय सनातन धर्म संपवणार??; अशा परखड शब्दांमध्ये योगी आदित्यनाथांनी वाभाडे काढले.
#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath says, "Attempts are being made to point fingers at the Sanatan culture. Attempts are being made to insult our heritage. But they forgot 'Jo Sanatan nahi mita tha Ravan ke ahankaar se, Jo Sanatan nahi diga tha Kans ke ahankaar se, Jo… pic.twitter.com/TiJKtmYCc2 — ANI (@ANI) September 7, 2023
#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath says, "Attempts are being made to point fingers at the Sanatan culture. Attempts are being made to insult our heritage. But they forgot 'Jo Sanatan nahi mita tha Ravan ke ahankaar se, Jo Sanatan nahi diga tha Kans ke ahankaar se, Jo… pic.twitter.com/TiJKtmYCc2
— ANI (@ANI) September 7, 2023
सनातन धर्माला विरोध करणारेच संपले
योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले, लोक आपला मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यांना हे कळत नाही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तरीही ती थुंकी आपल्याच तोंडावर येऊन पडते. रावण, हिरण्यकश्यपू, कंस यांसारख्या राक्षसांनी ईश्वरी सत्तेला आव्हान दिले होते. त्या सगळ्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आणि देव आजही आहेत. सनातन धर्म हा सत्य आहे, जो कधीही नष्ट होणार नाही. ही देवाचीच कृपा आहे की सनातन धर्माला जेव्हा उभारी मिळते आहे त्याच काळात अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर उभे राहते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App