५० वर्षांचे काम अवघ्या सहा वर्षात पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या कामाची जागतिक बँकेनेही केली प्रशंसा!


जागतिक बँकेचा अहवाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत G20 शिखर परिषदेचे आयोजन करत असताना, जागतिक बँकेने जबरदस्त आनंदाची बातमी दिली आहे. जागतिक बँकेने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, मोदी सरकारने अवघ्या 6 वर्षात असे काम केले आहे ज्याला पाच दशके लागली असती. 50 years of work completed in just six years Prime Minister Modis work has also been praised by the World Bank

भारत सरकारने सुरू केलेल्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल जागतिक बँकेच्या दस्तऐवजात असे सांगण्यात आले आहे की JAM (जन धन, आधार, मोबाइल), सर्वांसाठी बँक खाती, आधार आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीमुळे अनेकांना फायदा झाला आहे. यासह, भारताने केवळ 6 वर्षांत आर्थिक समावेशाचे लक्ष्य गाठले आहे, जे कौतुकास्पद आहे.

विशेष म्हणजे जागतिक बँकेच्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, जर हे काम सामान्यपणे चालले असते तर किमान पाच दशके लागली असती. म्हणजे 50 वर्षांचे काम 6 वर्षात पूर्ण झाले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे भारताने हे यश संपादन केले आहे.

जागतिक बँकेचा अहवाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले की, ”आपल्या सरकारच्या मजबूत पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपल्या लोकांच्या प्रबळ इच्छाशक्तीचा हा परिणाम आहे. या यशाबद्दल मी माझ्या लोकांचे अभिनंदन करतो.”

50 years of work completed in just six years Prime Minister Modis work has also been praised by the World Bank

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात