एकूण मतदानाने २०२४ च्या लोकसभेच्या विक्रमाला मागे टाकले
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. एकूण मतदानाने २०२४ च्या लोकसभेच्या विक्रमाला मागे टाकल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानात संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ६५.५८ टक्के मतदान झाले होते. मात्र, अंतिम आकडे आल्यावर मतदानाची टक्केवारी बदलू शकते. अद्याप फेरमतदान झाले नसल्याची माहिती आयोगाने दिली.
मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील ४० जागांसाठी मतदान झाले. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात हजेरी लावलेल्या ४१५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे. तिसऱ्या फेरीत सर्वाधिक ११ जागा जम्मू जिल्ह्यात होत्या. यानंतर, बारामुल्लामध्ये सात, कुपवाडा आणि कठुआमध्ये प्रत्येकी सहा, उधमपूरमध्ये चार आणि बांदीपोरा आणि सांबामध्ये प्रत्येकी तीन विधानसभा जागा होत्या, जिथे मंगळवारी मतदान झाले.
यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये ५७.३१ टक्के मतदान झाले होते. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात ६१.३८ टक्के मतदान झाले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये मुख्य लढत भाजप, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स (आघाडी), पीडीपी यांच्यात असल्याचे मानले जात आहे. भाजपने जम्मूतील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे, काश्मीरमधील काही जागांसाठीच उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. याशिवाय अन्य छोट्या पक्षांनीही ही लढत रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more