वृत्तसंस्था
चंडीगड : भारतीय संरक्षण दलांमध्ये भरतीसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या अग्निवीर योजनेसंदर्भात काँग्रेस आणि बाकीचे पक्ष गैरसमज पसरवत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे. हरियाणा मध्ये अग्निवीरांना शासकीय नोकरीत 10 % आरक्षण देण्याची ही घोषणा आहे. Various concessions including 10% reservation for firemen in government jobs in Haryana
आमचं सरकार हरियाणामधील अग्निवीरांना राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विशिष्ट नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषित करत आहे. याअंतर्गत पोलीस हवालदार, मायनिंग गार्ड, फॉरेस्ट गार्ड, जेल वॉर्डन व एसपीओ पदांसाठी अग्निवीरांची थेट भरती केली जाईल. अग्निवीरांना गट क आणि गट ड मधील सरकारी पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल. परंतु, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला 5 वर्षांची सवलत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
गट क मधील नागरी विभागातील नोकऱ्यांमधील भरतीत अग्निवीरांसाठी 5 % आरक्षण, गट ड मध्ये 1 % आरक्षण दिलं जाणार आहे. जे कारखाने अथवा उद्योग अग्निवीराला दरमहा 30000 रुपये किंवा त्याहून अधिक पगार देतील त्या कारखान्यांना, उद्योगांना हरियाणा सरकार वार्षिक 60000 रुपये अनुदान देईल, अशी माहिती मुख्यमंत्री सैनी यांनी दिली.
अग्निवीर योजनेस संदर्भात काँग्रेस आणि बाकीचे पक्ष गैरसमज पसरवत असताना हरियाणा सरकारने तसेच बाकीच्या भाजपा सरकार यांनी विविध सवलती अग्निवीरांसाठी जाहीर केल्या आहेत.
5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, गट क मधील भरती करताना अग्निवीरांसाठी 5 % जागा राखीव असतील. तसेच जे अग्निवीर 4 वर्षांच्या सेवेनंतर परततील, त्यांना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकार त्यांना 5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देईल.
निमलष्करी दलांमध्येही आरक्षण
दरम्यान, सीआएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ व एसएसबीच्या प्रमुखांनी अग्निवीरांसाठी आरक्षणाची घोषणा केली होती. माजी अग्निवीरांना निमलष्करी दलांमध्ये 10 % आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच वयोमर्यादा व शारीरिक चाचणीतही सुट दिली जाणार आहे. सीआयएसएफच्या महासंचालिका नीना सिंह यांनी म्हटलं होतं की पहिल्या तुकडीतील अग्निवीर निवृत्त झाल्यानंतर त्यांना वयोमर्यादेत 5 वर्षांची तर त्यानंतरच्या तुकड्यांमधील अग्निवीरांना निमलष्करी दलांच्या वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल.
अग्निवीर योजना काय आहे?
भारतीय सैन्यदलांत 17.5 ते 21 वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी दिली जाते. या तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) भारतीय सैन्यदलात समाविष्ट करून घेतलं जातं. तसेच त्यांना महिन्याला 30 ते 40 हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) दिलं जातं. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील 30 % रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागते. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत 11.71 लाख रुपये दिले जातात. अग्निवीराचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना कामगिरीच्या आधारावर स्थायी सेवेत दाखल करून घेतलं जातं. प्रत्येक तुकडीतील 25 % अग्निवीरांना पद्धतीने स्थायी सेवेत स्थान दिलं जातं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App