विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – कोरोना प्रतिबंधक लशींवरील बौद्धीक संपदा हक्क तात्पुरते रद्द करावे, या भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. USA support India in corona vaccine issue
कोरोना प्रतिबंधक लशींवरील बौद्धीक संपदा हक्क, तंत्रज्ञान हस्तांतर आणि विक्रीबाबतचे हक्क रद्द केल्यास जगभरात अनेक ठिकाणी उत्पादन सुरु होऊन वेगाने लस पुरवठा करता येईल, असे भारताचे म्हणणे आहे. अमेरिकेने भारताच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
कोरोना संसर्गाचे संकट जागतिक असल्याने या अभूतपूर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी अभूतपूर्व उपाययोजना आखणे आवश्यूक आहे. बायडेन प्रशासनाचा बौद्धीक संपदा हक्कांवर पूर्ण विश्वाअस आहे, मात्र जागतिक साथ संपविण्यासाठी आमचा हे हक्क काही कालावधीसाठी रद्द करण्याच्या मागणीला अमेरिकेने पाठिंबा आहे.
या मागणीचा पाठपुरावा जागतिक व्यापार परिषदेच्या सध्या सुरु असलेल्या बैठकीतही करणार असल्यचे अमेरिकेने सांगितले. जागतिक व्यापार संघटनेमध्ये एखादा मुद्दा मंजूर होण्यासाठी सार्वमत आवश्य क असल्याने या गोष्टीला विरोध असणाऱ्यांबरोबर मुद्द्यांच्या आधारावर वाटाघाटी करण्यास अमेरिका तयार असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App