विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपुरते जवळ केलेल्या काका शिवपाल यादव यांना अखिलेश यादव यांनी निवडणुकीनंतर अखेर पुन्हा दूर सारले आहे. समाजवादी पक्षाच्या बैठकीला शिवपाल यादवांना निमंत्रणच दिलेले नाही. Uncle-nephew’s consolation “fails” in Uttar Pradesh elections; Shivpal Yadav was taken away by Akhilesh Yadav !!
वास्तविक शिवपाल यादव समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. परंतु, अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीला त्यांना निमंत्रण देण्याचे टाळले आहे. स्वतः शिवपाल यादव यांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. समाजवादी पक्षाच्या आमदारांची बैठक आहे. त्यासाठी मी दोन दिवसांचे माझे सर्व कार्यक्रम रद्द केले. पण मला निमंत्रणच मिळाले नाही, अशी खंत शिवपाल यादव यांनी व्यक्त केली आहे.
अखिलेश यादव यांचे जसे त्यांचे वडील मुलायमसिंग यादव यांच्याशी राजकीय दृष्ट्या पटत नाही तसाच शिवपाल यादव या काकांशी देखील त्यांचा राजकीय 36 चा आकडा आहे. 2022 च्या निवडणुकीपूर्वी मात्र अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यादव यांच्याशी जुळवून घेतले होते. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवण्यास सांगितले होते. काका-पुतण्यांच्या पुरण्याची दिलजमाई झाली असे त्यावेळी मानले गेले होते. परंतु ही दिलजमाई फक्त निवडणुकीपुरती टिकली आता मात्र ज्यावेळी समाजवादी पक्षाचा मोठा पराभव झाला आहे, तेव्हा अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यादव यांना पुन्हा एकदा दूर लोटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App