जोधपूर-भोपाळ पॅसेंजरचे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरले, कोटा जंक्शनजवळ अपघात!

मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे मार्ग विस्कळीत Two coaches of Jodhpur Bhopal passenger derailed accident near Kota Junction

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा जंक्शनजवळ मोठी दुर्घटना टळली. जोधपूर-भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे शुक्रवारी रात्री उशीरा रुळावरून घसरले. कोटा जंक्शनजवळ हा अपघात झाला. रेल्वेगाडी रुळावरून घसरल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

अपघातानंतर रेल्वे सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून रेल्वेचे डबे रुळांवर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे मार्ग विस्कळीत झाला असून त्यामुळे अनेक गाड्या उशीराने धावल्या. तसेच अनेक गाड्या वळवाव्या लागल्या.

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, जोधपूर-भोपाळ पॅसेंजर शुक्रवारी संध्याकाळी जोधपूरहून भोपाळसाठी निघाली होती. ट्रेन कोटा जंक्शनला पोहोचताच. त्याचे दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अपघातानंतर काही वेळाने ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. जेणेकरून इतर गाड्या वेळेवर धावता येतील.

राजस्थानमध्ये असा रेल्वे अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 24 डिसेंबर रोजी राजस्थानमधील बालोत्रा ​​येथील समदरी रेल्वे स्थानकाजवळ एक पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली होती. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. जोधपूरहून पालनपूरला जाणाऱ्या डेमू पॅसेंजर ट्रेनसोबत हा अपघात झाला. समदरी स्थानकापूर्वी काही अंतरावर डेमू पॅसेंजर गाडी रुळावरून घसरली होती. मात्र, गाडी थांबताच प्रवासी खाली उतरले आणि जीव वाचला. त्यानंतर ट्रेनसमोर गाय आल्याने लोको पायलटने अचानक ब्रेक लावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रेल्वेची दोन चाके रुळावरून घसरली.

Two coaches of Jodhpur Bhopal passenger derailed accident near Kota Junction

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात