Saket Gokhale : ‘टीएमसी’ खासदार साकेत गोखले यांच्या अडचणीत वाढ!

Saket Gokhale

न्यायालयाने मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत निश्चित

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरात येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी (१३ ऑगस्ट) तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत फौजदारी आरोप निश्चित केले. अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांच्यावर फौजदारी आरोप निश्चित करण्यात आले आहेत, पोलिसांनी या प्रकरणात अनुसूचित गुन्ह्यासाठी त्याच्यावर आरोप निश्चित केले आहेत.

विशेष न्यायालयाने सीआरपीसीच्या कलम ३०९ अंतर्गत गोखले यांचा अर्जही फेटाळल्याचे ईडीने म्हटले आहे. पीएमएलए, 2002 अंतर्गत न्यायालय जोपर्यंत त्याच्याविरुद्धच्या फौजदारी खटल्याचा निकाल देत नाही तोपर्यंत कारवाई स्थगित करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे.

TMC MP Saket Gokhale problems increase

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात