बांगलादेशात परत गेल्यास आयुष्यभर तुरुंगातच काढावे लागणार!
विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढाका येथे 19 जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अबू सईदच्या मृत्यूप्रकरणी शेख हसीना आणि इतर सहा जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.
त्यामुळे शेख हसीना बांगलादेशात परत आल्यास त्यांना उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागू शकते, असे मानले जात आहे. 19 जुलै रोजी ढाका येथील मोहम्मदपूर भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किराणा दुकानाचा मालक अबू सईद ठार झाला होता.
शेख हसीना, अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर, माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल, माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून, माजी डीबी प्रमुख हारुण, माजी डीएमपी सहआयुक्त बिप्लब कुमार आणि माजी डीएमपी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात आयुक्त हबीबुर रेहमान यांना आरोपी करण्यात आले आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, शेख हसीना आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय या प्रकरणात अज्ञात पोलिस अधिकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. कथित विद्यार्थी आंदोलनाच्या दबावाखाली 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पळून गेल्यानंतर शेख हसीना यांच्यावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more