मोदींच्या प्रतिमा हानीसाठीच महुआ मोईत्रांचे पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न; महुआंचा लॉगिन आयडी वापरल्याची दर्शन हिरानंदानीची कबुली!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गौतम अदानी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब व्हावी या सुप्त हेतूनेच तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारले. काही विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट संदर्भातली माहिती आपण त्यांना देत होतो. इतकेच नाही तर, महुआ मोईत्रांचा अधिकृत लॉगिन आयडी देखील वापरत होतो, अशी स्पष्ट कबुली लाचखोरी करून प्रश्न विचारण्याच्या घोटाळ्यातला “पॉईंट मॅन” रियल इस्टेट बिझनेसमन दर्शन हिरानंदानी याने दिली आहे. दर्शनने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करून महुआ मोईत्रा आणि आपण स्वतः केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. TMC MP Mahua Moitra targeted Adani to malign PM Modi, says businessman Darshan Hiranandani

गौतम अदानींना काही विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट दिली याची तपशीलवार माहिती आपल्याकडे होती. ती थेट महुआ मोईत्रा यांनाच पुरवावी आणि त्यांच्या वतीने लोकसभेत थेट प्रश्न विचारावेत यासाठी महूआंनी आपल्याला त्यांचा पर्सनल लॉगिन आयडी देखील दिला होता. तो आपण काही काळ वापरला.

इतकेच नाही तर महुआ मोईत्रांच्या काही फॉरेन ट्रिप साठी आपण पैसे दिले. त्यांच्या दिल्लीतल्या घराच्या नूतनीकरणासाठी मोठी रक्कम दिली. वेगवेगळ्या अरेंजमेंट्स केल्या. महूआंना अनेकदा महागडी गिफ्ट्सही दिली, अशी स्पष्ट कबुली दर्शन हिरानंदानीने या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा खराब व्हावी या हेतूनेच महुआंच्या सर्व कारवाया चालल्या होत्या आणि त्यांना आपण काही काळ साथ दिली, अशी कबुली दर्शनने दिली आहे. दर्शनच्या प्रतिज्ञापत्रामुळे खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरुद्धची लाचखोरीतून प्रश्न विचारण्याची केस लोकसभेच्या शिस्तभंग समिती पुढे मजबूत होणार आहे.

– ममतांच्या निकटवर्ती महुआ

महुआ मोईत्रा या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती मानल्या जातात आणि त्या त्यांच्याच तृणमूळ काँग्रेसच्या खासदार आहेत. त्या स्वतःला लिबरल समजतात. इतकेच नाही तर, हिंदू सणांच्या वेळी त्या नेमकेपणाने हिंदू धर्माची बदनामी होईल, अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया पोस्ट करतात. लिबरल मीडिया महुआ मोईत्रांना फायर ब्रँड खासदार मानतो. पण याच महुआ आता लाचखोरी करून प्रश्न विचारण्याच्या घोटाळ्यात अडकल्या आणि त्यांना या घोटाळ्यात मदत करणारा दर्शन हिरानंदानी यानेच महुआ मोईत्रांना आपण कशी मदत केली याची प्रतिज्ञापत्राद्वारे कबुली दिली आहे. त्यामुळे महुआ मोईत्रा आता कायद्याच्या कचाट्यात पुरत्या अडकल्या आहेत.

TMC MP Mahua Moitra targeted Adani to malign PM Modi, says businessman Darshan Hiranandani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात