अमित शहा, योगी आदित्यनाथ यांना धमकी, सीआरपीएफ पाठविला मेल


नक्षलवाद्यांच्या हल्यात छत्तीसगढमध्ये २२ जवान शहीद झाले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही धमकीचा मेला दिला असल्याचे उघड झाले आहे. Threate to Amit Shah, Yogi Adityanath, CRPF sends mail


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: नक्षलवाद्यांच्या हल्यात छत्तीसगढमध्ये २२ जवान शहीद झाले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही धमकीचा मेला दिला असल्याचे उघड झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांना धमकी देणारा मेल केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी हा धमकीचा मेल आहे. या मेलमध्ये अमित शहा यांच्यासह यूपीचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांचेही नाव आहे.



अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या धमकीच्या मेलबाबत संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. हा मेल मुंबईत सीआरपीएफला पाठवण्यात आला आहे. हा मेल केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या संबंधित सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचा तपास सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांनुसार आम्ही काम करू, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली.

नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी छत्तीसगडमध्ये गेले होते. नक्षलवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच जवनांनाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी नक्षलवाद्यांना दिला. अमित शहा हे छत्तीसगडमधून दिल्लीला रवाना होताच नक्षलवाद्यांनी त्यांना आव्हान दिलं. कोणा-कोणाचा सूड घेणार, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती.

Threate to Amit Shah, Yogi Adityanath, CRPF sends mail


इतर बातम्या वाचा…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात