पंढरपूरच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचे धनगर कार्ड तर भाजपने ३५ गावांच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीला घेरले


पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला सर्वच पक्षांनी घेरल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धनगर कार्ड काढले आहे. माढ्याचे भाजपाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मंगळवेढ्यातील ३५ गावांच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादी ला घेरले आहे. तर महाविकास आघाडीचा एकेकाळचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या थकित एफआरपीचा मुद्दा काढला आहे.Prakash Ambedkar’s Dhangar card in Pandharpur elections while BJP surrounded NCP over water issue in 35 villages


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला सर्वच पक्षांनी घेरल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धनगर कार्ड काढले आहे.

माढ्याचे भाजपाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मंगळवेढ्यातील ३५ गावांच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीला घेरले आहे. तर महाविकास आघाडीचा एकेकाळचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या थकित एफआरपीचा मुद्दा काढला आहे.



 

धनगरांची फसवणूक केल्याचा आरोप करताना आंबेडकर यांनी आगामी काळात शिक्षण आणि नोकरीतूनही आरक्षण काढून टाकले जाणार असल्याचा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे.

पंढरपूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी नाकारून प्रस्थापितांना तिकीट दिले. त्यामुळे धनगर समाजाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मधुकर मोटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना निवडून आणावे. बिरप्पा मोटे हे धनगर समाजाचे असून ते निवडून आल्यास धनगरांच्या प्रश्नांना वाचा फोडतील, असे आंबेडकर म्हणाले.

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न मांडताना बारामतीसाठी राष्टÑवादीने पाणी चोरल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. दुसऱ्या लोकांचे पाणी चोरणारे लोक मंगळवेढ्याला पाणी काय देणार ? अशी टीका करताना निंबाळकर म्हणाले, 2009 च्या निवडणुकीपासून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा बनवला जातोय.

दीड वषार्पासून महाविकास आघाडी सरकार राज्यांमध्ये सत्तेत आहे.दोन टीएमसी पाणी देण्याची भाषा करणाऱ्यानी आतापर्यंत दोन बादल्या पाणी तरी या लोकांना दिलं का? नीरा देवघर मधील पंढरपूर सांगोला माळशिरस तालुक्याच्या वाट्याचं असलेलं पाणी ज्या लोकांनी चोरलं ते लोक मंगळवेढ्यातील या गावांना काय पाणी देणार? असा सवालही त्यांनी केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही राष्ट्रवादीला घेरले आहे. भगिरथ भालके यांच्या कारखान्याने शेतकऱ्याचे पस्ैो थकविले आहेत. यावरून शेट्टी यांनी हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची सगळ्याच बाजुंनी कोंडी झाली आहे.

दुसऱ्या बाजुला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांची उमेदवारीही राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी बनली आहे. मतदारसंघातील जनतेसाठी आत्तापर्यंत अनेक आक्रमक आंदोलने करणाऱ्या गोडसे यांनाच कट्टर शिवसैनिक पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. तर राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढू देण्याची कॉँग्रेसची तयारी नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अद्याप प्रचारासाठी फिरकलेही नाहीत.

Prakash Ambedkar’s Dhangar card in Pandharpur elections while BJP surrounded NCP over water issue in 35 villages

 

इतर बातम्या वाचा…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात