शेतकऱ्याचा मुलगा, पत्रकार ते भारताचे सरन्यायाधीश, जाणून घ्या न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालायाचे नवे सरन्यायाधिश म्हणून न्या. नुथालापती व्यंकट रमणा यांनी आज सुत्रे स्वीकारली. रमणा हे मागील चार दशकांपासून कायदा आणि न्यायव्यवस्थेचा भाग आहेत. जम्मू- काश्मीारमधील इंटरनेटवरील बंदी उठविणे, सरन्यायाधीशांचे कार्यालय आरटीआयच्या कक्षेत आणणे, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात बहुमत चाचणीचे निर्देश असे महत्वाचे निवाडे त्यांनी आलीकडच्या काळात दिले. त्याचे दूरगामी परिणाम झाले आहेत. CJI Ramanas glorious lifer journey

रमणा हे १७ फेब्रुवारी २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ पासून त्यांनी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले.



एनव्ही रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम हे त्यांचे मूळ गाव. पूर्ण वेळ वकिली करण्यापूर्वी रमणा यांनी काही काळ एका तेलुगू दैनिकात पत्रकार म्हणून देखील काम केले होते.

त्यांनी १९८३ मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून पूर्णवेळ वकिली करायला सुरुवात केली. केंद्रीय तसेच आंध्रप्रदेश प्रशासकीय लवाद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील त्यांनी दिवाणी, फौजदारी, घटनात्मक, कामगार, सेवा आणि निवडणुकीशी संबंधित खटल्यांमध्ये देखील विधिज्ञ म्हणून काम पाहिले होते.

पुढे केंद्र सरकारसाठी त्यांनी अतिरिक्त स्थायी सल्लागार म्हणून देखील काम पाहिले. ते हैदराबादेत काहीकाळ केंद्रीय प्रशासकीय लवादामध्ये भारतीय रेल्वेचे कायदा सल्लागार देखील होते. याचवेळी त्यांच्याकडे आंध्रप्रदेश सरकारची अतिरिक्त ॲडव्होकेट जनरल पदाची देखील जबाबदारी देण्यात आली होती. ते २००० मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात पूर्णवेळ न्यायाधीश बनले. पुढे त्यांची दिल्लीला मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाली आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्त करण्यात आले.

CJI Ramanas glorious lifer journey


इतर बातम्या वाचा…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात