भावी सरन्यायाधीश रामण्णा यांच्याविरोधातील गंभीर तक्रारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; आंध्रचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी केले होते आरोप

भावी सरन्यायाधिश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्याविरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. Complaints against Justice Ramanna rejected by Supreme Court, a complaint lodged by Andhra Chief Minister Reddy


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भावी सरन्यायाधिश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्याविरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
रामण्णा हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या कामकाजात तेलगू देशम पक्षाच्या हितासाठी हस्तक्षेप करत आहेत, अशी तक्रार रेड्डी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती.याबाबत त्यांनी सरन्यायाधिश शरद बोबडे यांना पत्र लिहिले होते. सर्वोच्च न्यायालयाने इन हाऊन कामकाजाने ही तक्रार फेटाळली आहे.सर्वोच्च न्यायालयाने वेबसाइॅटवर टाकलेल्या आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ६ आॅक्टोबर २०२० रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेी तक्रार फेटाळून लावत आहोत. याबाबत झालेले सगळे कामकाज हे गोपनिय ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते सार्वजनिक करण्यात येणार नाही.

दरम्यान, न्या. रामण्णा यांचा पुढील सरन्यायाधिशपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी त्यांची सरन्यायाधिशपदासाठी शिफशरस केली आहे. २४ एप्रिल रोजी ते सरन्यायाधिशपदाचा कार्यभार स्वीकारतील.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात सीबीआयकडून ११ खटले दाखल आहेत. सहा खटले अंमलबजावणी संचालनालयाकडून आणि १८ खटले पोलीसांकडून दाखल आहेत. त्यावरून उच्च न्यायालयाबरोबर रेड्डी यांचे वाद झाले होते. त्यावरून रेड्डी यांनी आरोप केला होता की न्या. रामण्णा, तेलगू देशम आणि उच्च न्यायालयाच्या काही न्यायमूर्तींंमध्ये यांच्यात नेक्सस तयार झाले आहे. यातून उच्च न्यायालयाच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते

Complaints against Justice Ramanna rejected by Supreme Court, a complaint lodged by Andhra Chief Minister Reddy

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*