Imran Khan : पाकिस्तानात इम्रान खानचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले; 2 आठवड्यांचा अल्टिमेटम, सुटका न झाल्यास तुरुंगातून सोडवण्याचा इशारा

Imran Khan

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान  ( Imran Khan  ) यांच्या सुटकेबाबत रविवारी रात्री उशिरा मोठा गदारोळ झाला. इम्रानच्या पक्ष पीटीआयच्या हजारो कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. हे सर्वजण राजधानी इस्लामाबादमधील कॅटल ग्राऊंडवर सभेसाठी जात होते. मात्र एनओसी नसल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांना शहरातील प्रवेशद्वारावर अडवले.

इस्लामाबादचे छावणीत रूपांतर झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. इस्लामाबादचे एएसपी शोएब खान यांच्यासह सुमारे दोन डझन पोलिस गंभीर जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. इम्रान समर्थकांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उखडून टाकले. कार्यकर्त्यांनी मोठे कंटेनर उलटले.



यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आली नाही. यानंतर सायंकाळी उशिरा इस्लामाबाद येथील रॅलीला प्रशासनाने परवानगी दिली. रॅलीत शाहबाज सरकारला इम्रान खान यांना सोडण्यासाठी 2 आठवड्यांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन म्हणाले की, जर इम्रान यांची 2 आठवड्यांत सुटका झाली नाही तर आम्ही त्यांना स्वतःहून सोडवू. ते म्हणाले की ते नेतृत्व करतील आणि पहिली गोळी झेलतील.

निवडणुकीनंतर पीटीआयची पहिली रॅली

8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाची ही पहिलीच रॅली होती. बंदीमुळे इम्रानच्या पक्षाला निवडणूक लढवता आली नाही, त्यांच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. इम्रान यांनी गर्दी जमवून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आपली लोकप्रियता आणि ताकद दाखवली आहे. सरकारने दोन महिन्यांत दोनदा रॅलीला मान्यता नाकारली होती.

रॅलीदरम्यान, नॅशनल असेंब्लीमधील पीटीआय नेते उमर अयुब खान म्हणाले की, इम्रान खान यांची सुटका होईपर्यंत पक्ष गप्प बसणार नाही. आम्ही इम्रान खान यांचे सैनिक आहोत आणि जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत खाली बसणार नाही, असे ते म्हणाले.

Thousands of Imran Khan’s supporters take to the streets in Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात