Prakash Ambedkar : संभाजीराजे + जरांगे + बच्चू कडू यांची अद्याप नुसतीच बोलणी; प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकरांनी साधली तिसऱ्या आघाडीची संधी!!

Prakash ambedkar

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा सुसंस्कृत व्यासपीठावर आणण्यासाठी दोन प्रस्थापित आघाड्यांच्या म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात तिसरी आघाडी करण्याची घोषणा करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे आणि बच्चू कडू यांची नुसतीच बोलणी चाललीत. प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळीच तिसरी आघाडी मधल्या मध्ये साधून घेतली. Prakash ambedkar establishes third front ahead of sambhjiraje, manoj jarange and bacchu kadu

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी नवीन आघाडीची घोषणा केली. जे पक्ष मनोज जरांगेसोबत जातील, त्या पक्षांसोबत जाणार नाही, अशी ठाम भूमिका जाहीर करून प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र आणि वेगळी तिसरी आघाडी साधली. निवडणुकीसंदर्भात काही पक्षांची चर्चाही झाल्याचे आंबेडकर म्हणाले. तर खुल्या जागांवर आदिवासी उमेदवारांना निवडणुकीत  असल्याचीही घोषणा आंबेडकरांनी केली. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी आदिवासी पक्षांची मोट बांधलीय.


Mohammad Yunus : मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानला दिला मोठा धक्का!


अशी आहे तिसरी आघाडी :

गोंडवाना गणतंत्र पक्ष, आदिवासी गोड गवारी, आदिवासी माना समाज, आदिवासी जमात संघ, आदिवासी विद्यार्थी कृती समिती, भारत आदिवासी पक्ष, एकलव्य आघाडी, आदिवासी एकता परिषद आणि जयेश संघटना या पक्षांना बरोबर घेऊन आंबेडकरांनी आघाडी स्थापन केली.

प्रकाश आंबेडकर यांनी ही तिसरी आघाडी साधने आधी छत्रपती संभाजी राजे, मनोज जरांगे, बच्चू कडू, राजू शेट्टी, राजरत्न आंबेडकर वगैरे नेत्यांबरोबर तिसरी आघाडीची घोषणा केलीच होती. परंतु, या सगळ्या नेत्यांची घोषणा चर्चेच्याच पातळीवर राहिली. प्रत्यक्षात त्यांची तिसरी आघाडी अद्याप तरी अस्तित्वात आलेली नाही मात्र त्याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीची घोषणा करून स्वतःच तिसरी आघाडी अस्तित्वात आणली.

आता वर उल्लेख केलेला नेत्यांची चर्चा पूर्ण होऊन जरी नवीन आघाडी अस्तित्वात आली, तरी तिला आता तिसरी आघाडी न म्हणता चौथी आघाडी म्हणावे लागेल, अशी परिस्थिती प्रकाश आंबेडकर यांनी मधल्या मध्ये तिसरी आघाडी साधून त्या नेत्यांवर आणली.

Prakash ambedkar establishes third front ahead of sambhjiraje, manoj jarange and bacchu kadu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात