Surat : सुरतच्या गणेश मंडळावर दगडफेक, 33 जणांना अटक; निषेधार्थ हजारो लोकांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Surat

वृत्तसंस्था

सुरत : सुरतच्या (  Surat )लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा 6 तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटक करण्यात आलेले लोक इतर धर्माचे आहेत आणि रात्री उशिरा आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये हाणामारीही झाली. वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली.



शांततेचे आवाहन करण्यासाठी आलेल्या स्थानिक आमदार कांती बलार आणि पोलिसांशीही बाचाबाची झाली. डीसीपी विजय सिंह गुर्जर आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी एक पोलिस अधिकारी जखमी झाले.

रात्री उशिरा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. सुरतमध्ये सुमारे 1000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी 35 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांची कारवाई….

सय्यदपुरा भागात (जेथे दगडफेक झाली) पोलीस मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्यात आणि अटक करण्यात पोलीस व्यस्त आहेत. त्याचबरोबर दोन धार्मिक गटांमध्ये संघर्ष होऊ नये यासाठी ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे.

लाठीचार्ज आणि दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याबरोबरच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पोलिसांनी मंडळाजवळील घरांमध्ये जाऊन चौकशी आणि तपास केला, कारण पोलिसांनी लोकांना बाहेर बोलावल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याचा धोका होता.

संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुरतमधील ज्या भागात विविध धर्माचे लोक राहतात त्या भागात पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनीही शहरातील सर्वच भागात गस्त घालण्यास सुरुवात केली. नानपुरा, रांदेर, महाराणा प्रताप सर्कलसह भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.

Stone pelting at Ganesh Mandal in Surat, 33 people arrested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात