“यह है आजादी का अमृत” म्हणत जम्मूतली जनता धावली; स्वच्छतेचा केला निर्धार


वृत्तसंस्था

जम्मू : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छता अभियान तसेच 370 कलम हटल्यानंतरची मुक्तता या सगळ्यांचा आनंद घेत जम्मूतली जनता आज रस्त्यांवर मुक्तपणे धावली. “This is the nectar of freedom,” said the Jammu and Kashmir people. Determination of cleanliness

जम्मू महापालिकेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छतेचा मोटो घेऊन मॅरेथॉनचे आयोजन केले होते. याला जम्मूतल्या जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला. याला 370 कलम हटल्याची याला महत्त्वाची पार्श्वभूमी होती. या मॅरेथॉनमध्ये सगळेजण विजय झाल्याची घोषणा जम्मू महापालिकेने केली कारण जम्मू शहर स्वच्छ करण्याचा तसेच प्लास्टिक बागांना नकार देण्याचा संदेश यातून नागरिकांनी दिला.



आपापल्या गल्ली मोहल्ल्यात याची स्वच्छता करण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन घेतली आहे. जम्मूतले नागरिक जबाबदार आहेत. त्यांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली आहे. महापालिका यब नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि यंत्रणा त्यासाठी पुरवेल, अशी ग्वाही जम्मू महापालिकेच्या आयुक्त अवन्या लवासा यांनी दिली. जम्मू-काश्मीरला पर्यटनाचे हब म्हणून पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर स्वच्छता अतिशय महत्त्वाची बाब आहे. नागरिकांनी ती करण्याची बाब मनावर घेतली आहे आणि त्यातूनच स्वच्छतेचा मोटो घेऊन आजची मॅरेथॉन आयोजित केल्याचे अवन्या लवासा यांनी स्पष्ट केले.

जम्मूमधील नागरिकांनी स्वच्छतेसाठी गल्ली आणि मोहल्ला कमिट्या बनवल्या आहेत. या कमिट्या प्रत्यक्ष स्वच्छतेचे काम करण्याबरोबरच महापालिकेशी समन्वय राखून यंत्रणा उपलब्ध करून देतील आणि घेतील. जबाबदारी वाटपात नागरिक आणि प्रशासन एकमेकांना सहकार्य करतील आणि स्वच्छतेची प्रक्रिया निरंतर चालू ठेवतील, असा विश्वासही अवन्या लवासा यांनी व्यक्त केला.

370 कलम म्हटल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जे अभिनव उपक्रम सुरू झाले आहेत त्यामध्ये कालच काश्मीरमधल्या दोन मुघल गार्डन्सची पुनर्स्थापना करण्याचा सामंजस्य करार संगीता जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू फाउंडेशनशी करण्यात आला आहे. यातून मुघल गार्डनचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यात येईल. तेथे सिनेमांची शूटिंग होतील. पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल . श्रीनगरच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन या घटकाची भर पडून अर्थव्यवस्था सुधारेल.

अशाच प्रकारचा पुढाकार स्वच्छतेच्या मोटोमधून जम्मूमध्ये घेण्यात आला आहे.

जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेकरूंसाठी भव्य यात्रीनिवास बांधण्याचे काम आहे हाती घेण्यात आले आहे. ते पुढच्या तीन वर्षात पूर्ण होईल 3200 यात्रेकरूंची सोय या यात्री निवासात होणार आहे.

अशा पुढाकारातून जम्मू-काश्मीरचा येत्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने केल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक नागरिकांचा उत्साह आणि कार्यक्षमता यांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.

“This is the nectar of freedom,” said the Jammu and Kashmir people. Determination of cleanliness

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात