ठाकरे – पवार आणि काँग्रेसच्या सरकारने याकूब मेमनची कबर सजवली; मोदींचा परभणीतून घणाघात!!


विशेष प्रतिनिधी

परभणी : नकली शिवसेना आणि काँग्रेसच्या सरकारने पालघर मधल्या साधूंना तर न्याय दिला नाहीच, पण त्यांनी बॉम्बस्फोटातला फाशी झालेला आरोपी याकूब मेमन याची कबर सजवण्यात धन्यता मानली, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज परभणीतून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर प्रखर हल्ला चढविला. They were busy beautifying Yakub Memon grave… PM Modi attacks Congress fake Shiv Sena

परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी मोदींची प्रचंड जाहीर सभा झाली त्यावेळी त्यांनी विकसित भारताची व्हिजन मतदारांसमोर मांडली तसेच महाराष्ट्रातल्या आधीच्या ठाकरे पवार सरकारचाही कठोर शब्दांमध्ये समाचार घेतला.

परभणीची भूमी ही संत पाचलेगावकर महाराजांची भूमी आहे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन काम करणारी भूमी आहे. या भूमीत रझाकारांची मानसिकता असलेल्यांना थारा देणार का??, असा सवाल करून मोदी म्हणाले, महाराष्ट्रात नकली शिवसेना आणि काँग्रेस यांचे सरकार असताना पालघर मध्ये साधूंचे मॉब लिंचिंग झाले. त्या साधूंना तर नक्की शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या सरकारने न्याय दिला नाहीच उलट मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी याकूब मेमन याला जेव्हा फाशी झाली तेव्हा त्याची कबर सजवण्यात ठाकरे – पवार आणि काँग्रेसच्या सरकारने धन्यता मानली.

काँग्रेसची मानसिकता नेहमी फुटीरतावादाचेच राहील काँग्रेसने देश स्वतंत्र होताना देशाच्या फाळणीला मान्यता दिली नंतर जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद जोपासणाऱ्या राजवटीला अधिमान्यता दिली. तिथे बाबासाहेबांनी दिलेले संविधान संपूर्णपणे कधीच लागू होऊ दिले नाही. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सामाजिक न्याय कधी लागू झालाच नाही. तिथे काँग्रेसने दुष्टीकरणाचे राजकारण केले पण तिथले दलित, आदिवासी समाज कायम सामाजिक न्यायापासून वंचित ठेवले. ही सगळी पापे काँग्रेसच्या कार्यकाळात झाली आणि आजही काँग्रेस तो मार्ग सोडायला तयार नाही अशी घणाघाती टीका मोदींनी केली.

They were busy beautifying Yakub Memon grave… PM Modi attacks Congress fake Shiv Sena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात