विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे “चाणक्य” असल्याचा डांगोरा मराठी माध्यमे कितीही पिटत असली तरी, प्रत्यक्षात शरद पवार शब्द फिरवण्यात किती आणि कसे माहीर आहेत, हे आत्तापर्यंत अनेकांनी उघडपणे सांगितले. त्यात आता खुद्द त्यांच्या पुतण्याने भर घालून पहाटेच्या शपथविधी बद्दल गौप्यस्फोट केले आहेत. Sharad pawar betrayed amit Shah despite 5 – 6 meetings : ajit pawar
विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी नेमके काय आणि कसे ठरले होते, याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सगळ्यांना चकित केले होते, पण ते सरकार फक्त 78 तास टिकले होते. पहाटेच्या त्या शपथविधीच्या घडामोडींबाबत अजित पवार यांनी आज इंदापुरात मोठा खुलासा केला.
अजित पवारांचे गौप्यस्फोट
2004, 2009, 2014 आणि 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करते होते. देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला कुठलं मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला, तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8.00 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टिकू शकलं नाही.
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एक काम झालं की दुसरं काम, ते झालं की तिसरं काम, पण आमच्या पक्षात मात्र अलबेल नव्हतं. इथे तसं चालत नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आरएसएसची त्यांना शिकवण आहे. मोदींच्या डोक्यात नेहमी देशाचा विकास असतो. मोदी निवडून आले की संविधान बदलतील अशा थापा विरोधक मारतात!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App