हैदराबादेत मतदार याद्यांचे कायदेशीर शुद्धीकरण; तब्बल 5,41,201 मतदारांची नावे टाकली वगळून; घ्या अर्थ समजून!!

वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणची राजधानी हैदराबाद मध्ये निवडणूक आयोगाने कायदेशीर मतदार यादी शुद्धीकरण प्रयोग केला. यात प्रचंड मोठ्या संख्येने डुप्लिकेट, मृत आणि स्थलांतरीत मतदार आढळले. इतकेच नाही तर, स्थलांतरीत मतदारांची संख्या तब्बल 4 लाख 39 हजार 801 एवढी आढळली. निवडणूक आयोगाने सगळे कायदेशीर निकष लावून मतदार यादीचे शुद्धीकरण केले. voters were removed from the electoral rolls duly following the instructions of ECI

या शुद्धीकरणाचे तपशील असे :

  • हैदराबादच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस जारी करून जानेवारी 2023 पासून, मृत, डुप्लिकेट आणि स्थलांतरित मतदार हटविले.
  • हैदराबाद जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात एकूण 47,141 मृत मतदार, 4 लाख 39हजार 801 स्थलांतरित मतदार आणि 54,259 मतदार डुप्लिकेट ठरले होते. या सर्व मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत, म्हणजेच एकूण 5 लाख 41 हजार 201 मतदारांची नावे ECI च्या सूचनांचे पालन करून मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.
  • त्याच बरोबर घर नंबर चुकलेल्या 1 लाख 81 हजार 405 मतदारांची छाननी करून त्यात दुरुस्ती केली.
  •  5 लाख 01 हजार 604 नव्या कायदेशीर दृष्टीने पात्र मतदारांची नावे नोंदवली.

जुने हैदराबाद हा खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा मतदारसंघ आहे. तिथे मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट, मृत, स्थलांतरीत मतदारांची नावे तशीच मतदार याद्यांमध्ये शिल्लक राहिली होती. त्या मतदार यादीचे शुद्धीकरण आवश्यक होते. ते निवडणूक आयोगाने सगळे कायदेशीर निकष लावून केले आहे. यातले बहुसंख्य स्थलांतरीत मतदार बांगलादेशी अथवा रोहिंग्या असल्याचे आढळून आले.

voters were removed from the electoral rolls duly following the instructions of ECI

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात