विदर्भात 2019 पेक्षा 5% कमी मतदान; देशातील मतदानात 8% घट, गतवेळी झाले होते सरासरी 69% मतदान


वृत्तसंस्था

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशात 2019च्या तुलनेत 8 टक्के तर महाराष्ट्रात 4.85% कमी मतदान झाले. वाढते तापमान याचे प्रमुख कारण सांगितले जाते. पहिल्या टप्प्यातील देशातील 102 जागांवर 62% मतदान झाले. मागील वेळी 69.96% मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात नितीन गडकरी यांच्यासह 8 केंद्रीय मंत्री आणि 2 माजी मुख्यमंत्र्यांसह एकूण 1625 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले. निकाल 4 जूनला लागणार आहे 5% lower turnout than 2019 in Vidarbha; 8% decline in voter turnout in the country, compared to last year’s average turnout of 69%

पहिल्या टप्प्यातील १०२ पैकी ७३ जागा सर्वसाधारण, ११ एसटी, १८ एससीसाठी राखीव होत्या.

कुठे किती मतदान?

बिहार 46.32%

राजस्थान 50.27%

मिझोराम 52.62%

बंगाल, त्रिपुरा, पुडुचेरी, आसाममध्ये 70% मतदान.

म.प्र. आणि छत्तीसगडसह 8 राज्यांमध्ये 60 ते 70% दरम्यान मतदान

यूपी व उत्तराखंडसह 8 राज्यांत 50-60% दरम्यान.

पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 5 जागांवर शुक्रवारी शांततेत मतदान झाले. विदर्भात तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे मतदान घटल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये सरासरी 64.85% मतदान झाले होते तर यंदा 60.22% पर्यंत घटले. या पाचपैकी 3 जागांवर भाजप, तर प्रत्येकी एका जागेवर शिंदेसेना व काँग्रेसचे खासदार आहेत. मतदान घटल्याने भाजपच्या काळजीत मात्र भर पडली आहे.

दुसरा टप्पा 26 एप्रिलला

पुढच्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 जागांवर 26 एप्रिलला मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा समावेश आहे.

5% lower turnout than 2019 in Vidarbha; 8% decline in voter turnout in the country, compared to last year’s average turnout of 69%

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात