संसदेची विशेषाधिकार समिती रमेश बिधुरी आणि दानिश अली प्रकरणाची चौकशी करणार

New Parliament building to be ready before August 15 next year Says Lok Sabha speaker Om Birla

सभापती ओम बिर्ला यांचे आदेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बसपा खासदार दानिश अली आणि भाजप नेते रमेश बिधुरी यांच्या मुद्द्यावर खासदारांच्या तक्रारी विशेषाधिकार समितीकडे पाठवल्या आहेत. आज (२८ सप्टेंबर) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. The Privileges Committee of Parliament will probe the Ramesh Bidhuri and Danish Ali case

२१ सप्टेंबर रोजी चांद्रयान-3 च्या यशाच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चेदरम्यान रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावर चौफेर टीका झाली. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अपरूपा पोद्दार, द्रमुकच्या खासदार कनिमोझी आणि इतर अनेक विरोधी खासदारांनी दानिश अली यांच्याशी एकजूट दाखवली.

स्मृती इराणींना पाकिस्तानी संबोधल्याप्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात अमेठीमध्ये FIR दाखल

तसेच बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बिर्ला यांना पत्र लिहून भाजपा खासदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची मागणी या खासदारांनी मांडली होती.

तर भाजपाने बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच भाजपाचे खासदार निशिकांत दुबे आणि रवी किशन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून दानिश अली यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची मागणीही त्यांनी केली होती.

The Privileges Committee of Parliament will probe the Ramesh Bidhuri and Danish Ali case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात