मोदी सरकारने G20 शिखर परिषद दिल्ली केंद्रित न ठेवता समस्त भारतीय जनतेची केली; शशी थरूर यांचे गौरवोद्गार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपम मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेतून भारताने नेमके काय मिळवले?, याची चर्चा जगभर सुरू असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी मुत्सद्दी म्हणून काम केलेले काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्याचे “रहस्य” उघड करून सांगितले आहे.The Modi government made the G20 summit not Delhi-centric but for all Indian people; Tribute to Shashi Tharoor

आत्तापर्यंत G20 शिखर परिषदेच्या कोणत्याही अध्यक्ष असलेल्या देशाने जे केले नाही, ते भारताने केले. केंद्रातील मोदी सरकारने ही G20 परिषद केवळ दिल्ली केंद्रित न ठेवता समस्त भारतीय जनतेची करून त्यात जनतेचा सहभाग वाढविला. हे या परिषदेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरले, असे शशी थरूर यांनी सांगितले.



भारतातल्या 58 शहरांमध्ये G20 परिषदेच्या वेगवेगळ्या 200 बैठका आयोजित करून सर्व देशांच्या प्रतिनिधींना भारत दर्शन घडविले भारताची सांस्कृतिक ओळख करून दिली एरवी आशा बैठका देशांच्या राजधानीशी संलग्न ठरवून त्या केवळ औपचारिक उरतात. पण भारताने तसे केले नाही, हे शशी थरूर यांनी आवर्जून सांगितले.

शशी थरूर हे काँग्रेसचे खासदार असले तरी ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नाणावलेले मुत्सद्दी आहेत. संयुक्त राष्ट्र संघात ते भारताचे कायमचे प्रतिनिधी होते. वेगवेगळ्या देशांमधली राजदूत पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मुत्सद्द्याने G20 शिखर परिषदेच्या यशस्वीतेचे रहस्य सांगणे याला वेगळे महत्त्व आहे. विशेषतः काँग्रेसचे नेते G20 शिखर परिषदेतल्या तथाकथित उणीवा सांगत असताना शशी थरूर यांच्यासारख्या त्याच पक्षाच्या खासदाराने शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाची स्तुती करणे याला विशेष राजकीय महत्त्व आहे.

The Modi government made the G20 summit not Delhi-centric but for all Indian people; Tribute to Shashi Tharoor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात