VIDEO : विश्वचषकासाठी न्यूझीलंड टीमची अनोख्या पद्धतीने घोषणा, केन विलियम्सच्या नेतृत्वात उतरणार मैदानात!

न्यूझीलंडने अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे.

विशेष प्रतिनिधी

आगामी विश्वचषक २०२३ न्यूझीलंड क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली असून,  १५ सदस्यीय  संघाचे नेतृत्व केन  विलियम्सकडे सोपवण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या या संघाची घोषणा हटके पद्धतीने झाली असून, त्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. शिवाय, न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या हटके घोषणेचा एक व्हिडीओ देखील समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर  प्रचंड व्हायरल होत आहे. The announcement of the New Zealand team for the World Cup in a unique way

विश्वचषकासाठी निवड झालेल्या क्रिकेट संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांचा हा व्हिडीओ आहे.  यामध्ये प्रत्येक खेळाडूचे कुटुंबीय आपल्या खेळाडूचे नाव आणि त्याचा जर्सी नंबर सांगताना दिसत आहेत.  या व्हिडीओची सुरुवात केन विलियम्सनची पत्नी आणि दोन मुलांसह होते. यानंतर प्रत्येक खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या खेळाडूचे नाव आणि जर्सी नंबर व्हिडीओत  सांगितल्याचे दिसून येत आहे. कुणाच्या मुलाने कुणाच्या पत्नीने तर कुणाच्या आईने आपल्या खेळाडूचे नाव घेतले आहे. अशाप्रकारे विश्वचषक खेळण्यासाठी निवड झालेल्या न्यूझीलंडच्या १५ खेळाडूंची नावे घोषत करण्यात आली आहे.

ट्रेंट बोल्ट, मार्क चॅम्पमन आणि टॉम लॅथमसह १५ खेळाडूंचा  न्यूझीलंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडमध्ये असून एकदिवसीय मालिका खेळत आहे. न्यूझीलंडने अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे.

https://youtu.be/DTQU_v-PU8Y

विश्वचषक २०२३ साठी न्यूझीलंडचा संघ –

केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, इश सोधी. , टिम साउथी, विल यंग

The announcement of the New Zealand team for the World Cup in a unique way

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात