राहुल – उदयनिधीच्या बोलण्यात विसंगती; “इंडिया” आघाडीत “हिंदू” मुद्द्यावर फाटाफूटी!!


“इंडिया” आघाडीतल्या नेत्यांच्या बोलांमध्ये बोलत बोल आहेत का??, असं विचारायची खरंच वेळ आली आहे. याला कारण “इंडिया” आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांमधून मोठी विसंगती उघड्यावर आली आहे. Major contradiction emerged in statements of rahul gandhi and udayanidhi stalin over sanatan hindu dharma

एकीकडे तामिळनाडूतला द्रविड मुन्नेत्र कळघम, बिहार मधला राष्ट्रीय जनता दल यांचे नेते सनातन हिंदू धर्माला वाटेल तशी नावे ठेवून बदनाम करत आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी युरोपच्या दौऱ्यावर हिंदू धर्माची भलामण करत आहेत. इंडिया आघाडीतल्या या नेत्यांना हिंदू धर्माविषयी नेमकी आस्था आहे की द्वेष आहे, याचे प्रचंड कन्फ्युजन त्यांच्यातल्या त्यांच्यातच निर्माण झाले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, कोरोना असे संबोधून वादाची ठिणगी टाकली. उदयनिधींना 2 जी घोटाळ्यातला आरोपी आणि माजी केंद्रीय मंत्री राजाची साथ मिळाली. ए. राजाने सनातन हिंदू धर्माला एचआयव्ही आणि कुष्ठरोग या सार्वजनिक रोगांची उपमा देऊन त्याच्या निर्मूलनाची उर्मट भाषा वापरली.



राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद यांना तिलकधारी घृणास्पद वाटायला लागले. तिलकधारींनी देशात गुलामी आणल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

आता या नेत्यांची सनातन हिंदू धर्माच्या बदनामीची वक्तव्य कमी पडताहेत म्हणून की काय, दिल्ली आयआयटीच्या सहयोगी प्राध्यापिका दिव्या द्विवेदी यांनी पुढे येऊन भारतातून हिंदू धर्म कसा नष्ट होणार आहे, याची “भविष्यवाणी” केली. सनातन धर्मातले वर्चस्ववादी 10 % लोक या देशाला “भारत” असे संबोधन आहेत. ते आर्य वर्चस्ववादाचे प्रतीक आहेत, पण भविष्यात इथे हिंदू नावाचा कोणता धर्म अस्तित्वात राहणार नाही, असे भाकीत दिव्या द्विवेदी यांनी करून सनातन हिंदू धर्माविरुद्धच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या आगीत तेल ओतले.

पण एकीकडे “इंडिया” आघाडीतलेच हे घटक पक्ष आणि त्यांची इको सिस्टीम सनातन हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकत असताना, दुसरीकडे राहुल गांधींनी युरोपात मात्र हिंदू धर्माची भलामण केली आहे. आपण भगवद्गीता, सर्व उपनिषदे वाचली आहेत. खरा हिंदू धर्म कोणालाही दुखावत नाही. कोणाचाही द्वेष करायला सांगत नाही. हिंसाचाराचे समर्थन करत नाही. भाजप ज्याला हिंदू धर्म म्हणतो त्यांचा हिंदूपणाशी काहीही संबंध नाही. ते सत्तेसाठी वाटेल त्या टोकाला जाऊ शकतात. भाजपला या देशात वर्चस्ववादी आणि वर्णभेदी राजवट आणायची आहे, वगैरे टीका केली.

भारताच्या अध्यक्षतेखाली g20 ची परिषद होत असताना हिंदू धर्माविरुद्धच्या द्वेषाची आग भडकविण्याचा हा प्रयत्न झाला. पण या प्रयत्नांमधूनच खूप मोठी विसंगती समोर आली, ती म्हणजे एकीकडे द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल यांच्यासारख्या पक्षांच्या नेत्यांना सनातन हिंदू धर्म हा देशाला लागलेला रोग वाटला, तर राहुल गांधी सारख्या नेत्यांना हिंदू हा महान धर्म आहे. पण भाजप सत्तेसाठी त्या धर्माला बदनाम करतो आहे, असे वाटले. “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांमधले हे प्रचंड वैचारिक कन्फ्युजन उघड्यावर आले!!

… आणि तेव्हा घडत आहे, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उघडपणे हिंदुत्वाचा उच्चारही करत नाहीत. उलट जी 20 च्या सदस्य राष्ट्रांना राष्ट्रांच्या प्रमुखांना ते महात्मा गांधींच्या समाधीवर एकत्र नेतात. जी 20 परिषदेत वसुधैव कुटुंबकमचा संदेश देतात, इतकेच काय पण सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास ही भाजपच्या प्रचार तंत्रातली लोकप्रिय घोषणा ते g20 च्या मंचावरून देतात, त्याचवेळी इंडिया आघाडीतले नेते मात्र सनातन हिंदू धर्माविरुद्ध बोलून भारतीय समाज मन दुखावत मोदींच्याच सुप्त हिंदुत्वालाच बळ देत राहतात… ही सर्वात मोठी विसंगती “इंडिया” आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यांतून आणि त्यांच्या इकोसिस्टीमच्या कृतीतून उघड्यावर आली आहे.

Major contradiction emerged in statements of rahul gandhi and udayanidhi stalin over sanatan hindu dharma

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात