कॅनडातल्या खलिस्तानवाद्यांना लगाम घाला; पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंना सुनावले!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या g20 परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादा संदर्भात भारतासह सर्व देशांनी कठोर भूमिका घेतली. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वसुधैव कुटुम्बकमचा संदेश दिला, पण भारताच्या हिताशी कुठेही तडजोड होऊ देणार नाही, असे त्यांनी सर्व देशांच्या राष्ट्र प्रमुखांना द्विपक्षीय चर्चेच्या वेळी स्पष्टपणे सांगितले. Prime Minister Modi addressed Prime Minister Justin Trudeau

त्यापलीकडे जाऊन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पंतप्रधान मोदींनी कॅनडातल्या खलिस्तानवाद्यांना लगाम घाला, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. g20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जस्टिन ट्रूडो यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी, कॅनडात बसून भारतात आणि भारताबाहेर दहशतवादी कारवाया करणाऱ्या खलिस्तानवाद्यांना घेरले.

कॅनडात खलिस्तानवाद्यांनी भारतीय मुत्सद्द्यांना आणि हिंदू मंदिरांना टार्गेट केले. हे भारत खपवून घेणार नाही. तुम्हीही कॅनडा सरकार म्हणून खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालू नका. त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवा, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मोदींनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना इशारा दिला.

सर्वसामान्यपणे g20 च्या सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या वेळी दोन देशांमधल्या वाटाघाटींमध्ये अथवा सर्वोच्च नेत्यांमधल्या चर्चेमध्ये कठोर आणि स्पष्ट शब्दांचा वापर होत नाही. पण कॅनडातल्या खलिस्तानवाद्यांच्या गंभीर दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी जस्टिन ट्रुडो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करताना कठोर इशारा देणारी भाषा वापरली.

देशाची अखंडता एकात्मता आणि सार्वभौमत्व यांच्याशी भारत सरकार कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाही, हे मोदींनी अधोरेखित केले. भारत आणि कॅनडा यांचे संबंध मैत्रीपूर्ण लोकशाही तत्त्वावर आधारित आहेत. दोन्ही देश लोकशाही तत्वांचा सन्मान करतात. पण भारत कोणत्याही प्रकारचा फुटीरतावाद सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.

Prime Minister Modi addressed Prime Minister Justin Trudeau

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात