नरसिंह राव हिंदुत्ववादी, तर मग सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, पुरुषोत्तमदास टंडन, के. एम. मुन्शी, कृपलानी हे कोण होते??


गांधी परिवारनिष्ठ माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी आपल्या आत्मचरित्रात माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर भाजपचे पहिले पंतप्रधान म्हणून टीका केली. ही टीका त्यांनी सोनिया गांधींच्या उपस्थितीत केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांची गांधी परिवार निष्ठा सिद्ध झाली. शिवाय अय्यर यांनी टीका केलेले नरसिंह राव हे एकमेव बडे नेते नाहीत. त्यांनी आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केलेच होते. नरसिंह राव हे त्यांचे तिसरे “टार्गेट” आहेत, असे फार तर म्हणता येईल!! Manishankar ayer’s disgraceful allegation against p. v. narasimha rao as first BJP prime minister

पण मणिशंकर अय्यर यांनी राव यांच्या द्वेषातून आणि गांधी परिवार निष्ठेतूनही टीका केली असली, तरी त्या पलीकडे जाऊन नरसिंह राव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला, तर त्यांचा राजकीय कल ते पंतप्रधान झाल्यानंतर हिंदुत्ववादाकडे राहिला होता, हे नजरेआड करून चालणार नाही. पण अय्यर ज्या पद्धतीने नरसिंह राव यांच्यावर हिंदुत्ववादाचा ठपका ठेवतात, तसे ते बिलकुलच हिंदुत्ववादी नव्हते, ही वस्तुस्थिती आहे.

कारण नरसिंह राव यांच्या हिंदुत्वाची छटा ही सनातन होती. भारताच्या मूळ अध्यात्मिक आणि सांस्कृतिक गाभ्याचा स्वागत आणि स्वीकार करणारी होती. ती नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेच्या म्हणजे मुस्लिम अनुनयाच्या पलीकडची होती.

बाबरी मशीद पतना संदर्भात नरसिंह राव यांची भूमिका त्यांच्या समकालीन नेत्यांनी वादग्रस्त ठरवली असली, तरी नरसिंह राव यांनी पंतप्रधान म्हणून घटनात्मक चौकट ओलांडली नव्हती. तोडगा काढण्याचे शक्य तेवढे सगळे प्रयत्न त्यांनी केले ही वस्तुस्थिती देखील नाकारता येणार नाही.

पण केवळ बाबरी मशिदीच्या पतनावरून त्यांना भाजपचे पहिले पंतप्रधान ठरविणे हा नरसिंह राव यांच्या राजकीय कर्तृत्वावर पूर्णपणे अन्याय आहे. भले नरसिंह राव हे मणिशंकर अय्यर यांना भारत हे “हिंदू राज्य” आहे, असे म्हटले असतील, पण ती संकल्पना त्यांनी घटनाबाह्य पद्धतीने मांडलेली किंवा स्वीकारलेली नव्हती. उलट या देशात हिंदू बहुसंख्य आहेत. घटनात्मक लोकशाही तत्त्वाला अनुसरून त्यांच्या कलाने राज्य चालवावे लागेल, ही वस्तुस्थिती त्यांनी 50 वर्षांच्या दीर्घ अनुभवातून मांडली होती. मणिशंकर अय्यर यांनी त्याचा विपरीत अर्थ काढला हा नरसिंह राव यांचा दोष असू शकत नाही. तो अय्यर यांच्या गांधी परिवार निष्ठ बुद्धीचा दोष आहे.


इंदिरा गांधी, नरसिंह रावांच्या काळातले केंद्रीय मंत्री अरविंद नेतामांनी काँग्रेस सोडली; छत्तीसगडमध्ये मोठा धक्का!!


जुन्या काँग्रेस नेत्यांवर उथळ ठपका नव्हता

पण त्या पलीकडे जाऊन मणिशंकर अय्यर ज्या हेतूने आणि ज्या पद्धतीने नरसिंह राव यांच्यावर ते हिंदुत्ववादी असल्याचा ठपका ठेवतात, तर मग नरसिंह राव आणि स्वतः अय्यर ज्या काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि आहेत, त्याच काँग्रेस पक्षात सरदार वल्लभभाई पटेल, राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन, आचार्य जे. बी. कृपलानी, कन्हैयालाल मुन्शी, डॉ. संपूर्णानंद हे नेते होते. त्यांना अय्यर काय म्हणतील?? त्यांच्यावर कोणता टप्पा ठेवतील??, हा कळीचा प्रश्न आहे. कारण हे सर्व नेते जरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. पंडित नेहरूंच्या समकालीन होते, तरी या सर्व नेत्यांनी आपला राजकीय कल हा हिंदुत्व निष्ठेकडेच ठेवला होता हा इतिहास आहे.

सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. पुरुषोत्तम दास टंडन आणि आचार्य कृपलानी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. कन्हैयालाल मुन्शी कृषिमंत्री होते. डॉ. संपूर्णानंद हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. हे सर्व नेते स्वतंत्र प्रतिभेचे विद्वान म्हणून गणले जात होते. पण या सगळ्यांचा राजकीय कल हिंदुत्ववादाकडे असला, तरी त्यांच्यावर कोणी तसा उथळ ठपका ठेवलेला नव्हता. त्यांच्या काँग्रेसनिष्ठेविषयी कोणी शंका घेतली नव्हती.

सरदार वल्लभभाई पटेल यांना तर महात्मा गांधी हे काँग्रेस मधला हिंदू महासभावादी नेता असे म्हणायचे, तर हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी आणि जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना तेच महात्मा गांधी हिंदू महासभेतला “काँग्रेसी”, असे म्हणायचे.

कन्हैयालाल मुन्शी, आचार्य कृपलानी यांनी फाळणीला देखील विरोध केला होता. फाळणीला विरोध करणाऱ्यांमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे ज्येष्ठ बंधू शरद चंद्र बोस, तसेच समाजवादी पक्षाचे अध्‍वर्यू डॉ. राम मनोहर लोहिया हे देखील होते. मग या सर्व नेत्यांवर मणिशंकर अय्यर हे गांधी परिवार निष्ठ बुद्धीतून हिंदुत्ववादाचा ठपका ठेवणार का?? आणि तो हिंदुत्ववादी ठपका मणिशंकर अय्यर म्हणतात म्हणून इतका वाईट आहे का??, हा खरा मुद्दा आहे!!

वर उल्लेख केलेले सर्व नेते भारतीय राष्ट्रवादाचा विचार सर्वोपरी मानणारे होते. त्यांच्या राजकीय विचार प्रणालींमध्ये विशिष्ट मतभिन्नता होती, तरी ते व्यक्तीनिष्ठ राजकारणी नव्हते. त्याचबरोबर राजकीय भूमिकांशी प्रामाणिक राहणारे नेते होते, ही वस्तुस्थिती कशी दुर्लक्ष करून चालेल??

नरसिंह राव यांच्यावर हिंदुत्ववादाचा ठपका ठेवायचा असेल तर तो बाकीच्या नेत्यांवरही ठेवावा लागेल. पण म्हणून तो ठपका खराच आहे, हे मान्य करता येणार नाही.

उलट नरसिंह राव यांच्यासारखे प्रगल्भ नेते हे सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम दास टंडन आचार्य कृपलानी, कन्हैयालाल मुन्शी, डॉ. संपूर्णानंद यांच्या काँग्रेसी परंपरेतले उजव्या विचारसरणीकडे कल असणारे पण उदारमतवादी नेते मानावे लागतील.

राव यांच्या कर्तृत्वावर अन्याय

पण त्यासाठी गांधी परिवारनिष्ठ विचार सोडून वास्तववादी राजकीय प्रणालीचा अभ्यास करावा लागेल. मणिशंकर अय्यर हे माजी आयएफएस अधिकारी आहेत. पाकिस्तानात ते आपले वाणिज्य दूत होते. केंद्रात मंत्री होते. राजीव गांधींचे विश्वासू सल्लागार होते. या सर्व भूमिकांचा त्यांच्या अभ्यासावर इतका परिणाम झालाय, की त्यांच्यातला तटस्थ अभ्यासक हरवून गेला आणि त्यांनी नरसिंह राव यांच्यासारख्या मध्यममार्गी नेत्यावर सरधोपटपणे हिंदुत्वदाचा शिक्का मारला, पण तो नरसिंह राव यांच्या राजकीय कर्तृत्वावर अन्याय करणारा ठरला आहे.

Manishankar ayer’s disgraceful allegation against p. v. narasimha rao as first BJP prime minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात