गोविंदांच्या आनंदावर विरजण; यंदा दहीहंडी केवळ रात्री दहा वाजेपर्यंत


विशेष प्रतिनिधी

पुणे : अवघ्या महाराष्ट्रात कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी, बोल बजरंग बली की जय! टाकू माकूम, टाकू माकूम, करत महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात अतिशय गोविंदा पथक एकावर एक गगनभेदी असा दहीहंडीचा थर लावतात, आणि लाखो रुपयांचे दहीहंडीसाठी ठेवलेलं बक्षीस मिळवायचा प्रयत्न करतात. Dahi Handi celebration news

दहीहंडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिवर्धक वापरण्यास पूर्ण बंदीत्यामुळे यंदा गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा, दहीहंडी उत्सव रात्री दहा वाजेपर्यंतच साजरा होणार आहे. अशी माहिती शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे .

शहरातील काही सार्वजनिक दहीहंडी मंडळाने रात्री बारापर्यंत परवानगी मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा सोहळा दहा वाजेपर्यंतच संपवण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत , गणेशोत्सवा साठीची एक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यात काही कार्यकर्त्यांनी दहीहंडीला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी द्या अशी मागणी केली होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखावा लागेल. मुंबईच्या प्रमाणे दुपारपासून दहीहंडी सुरू होते, धरतीवर पुण्यात देखील सुरू करावी , आणि रात्री दहाच्या आत दहीहंडी संपवावी अशा सूचना अजित पवार यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिल्या.

Dahi Handi celebration news

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात