हिंदू राष्ट्रवाद हा शब्दच चुकीचा, भाजपमध्ये हिंदू पणा वगैरे काही नाही पॅरिस मधल्या विद्यापीठातून राहुल गांधींचा हल्लाबोल


वृत्तसंस्था

पॅरिस : भारताची राजधानी नवी दिल्लीत g20 परिषदेचे सुप वाजले असताना तिकडे फ्रान्सची राजधानी पॅरिस मधून काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदू राष्ट्रवाद हा शब्द चुकीचा आहे. भाजपमध्ये हिंदू पणा वगैरे काही नाही, असे राहुल गांधींनी पॅरिस मधल्या सायन्सेस पीओ विद्यापीठातून जाहीर केले. On foreign shores Rahul Gandhi steps up attack on BJP

भारतात g20 परिषद सुरू असताना राहुल गांधी युरोपच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे विविध कार्यक्रमांमध्ये ते भारतात लोकशाही नसल्याचा डांगोरा पिटत आहेत. असाच एका कार्यक्रमात त्यांनी पॅरिसच्या सायन्सेस पीओ विद्यापीठात विद्यार्थ्यांची संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्रवाद हा शब्द चुकीचा असल्याचा दावा केला.

राहुल गांधी म्हणाले, मी भगवद्गीता वाचली आहे. अनेक उपनिषदे वाचली आहेत. त्यामध्ये हिंदूपणा वगैरे काही नाही. भाजप जे बोलतो आहे आणि करतो आहे त्यातही हिंदूपणा नाही. कारण कोणताही हिंदू हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही. दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवत नाही. भाजपला फक्त सत्ता हवी आहे. त्यासाठी ते कोणतेही टोक गाठू शकतात, असा आरोप त्यांनी केला. भारतात लोकशाही संस्था धोक्यात आल्याचा दावाही त्यांनी पुन्हा एकदा केला.

भारतात g20 परिषद सुरू असतानाच राहुल गांधींनी युरोपचा दौरा आखला आणि तिथल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भारतीय लोकशाही विषयी प्रतिकूल मते व्यक्त केली. इकडे g20 सदस्य देशांच्या प्रमुखांना राष्ट्रपतींच्या मेजवानीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण नसल्याचा दावा करून काँग्रेस पक्षाने वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधींनी त्या परिषदेचे टायमिंग साधूनच परदेश दौरा आखल्याबद्दल मौन बाळगले.

On foreign shores Rahul Gandhi steps up attack on BJP

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!