आधी सनातन धर्माची बदनामी, आता 1000 मंदिरांमध्ये 650 कोटींची डागडुजी, अभिषेक; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन बॅकफूटवर!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : सनातन धर्माला डेंगी, मलेरिया, कोरोना, एचआयव्ही, कुष्ठरोग अशी वाट्टेल तशी दूषणे देऊन झाल्यानंतर तामिळनाडूचे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन बॅकफूटवर आले आहेत.1,000 temple consecrations done, believers laud govt, says Stalin

आपला पुत्र उदयनिधी याचे समर्थन केल्यानंतर तामिळनाडूतला प्रक्षोभ पाहिल्यावर स्टालिन यांना बॅकफूटवर येणे भाग पडले आहे. आता त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारने 1000 मंदिरांची डागडुजी करून तेथे अभिषेक केल्याचे सांगितले आहे, इतकेच नाही तर या मंदिरांच्या डागडुजी साठी तब्बल 650 कोटी रुपये खर्च केल्याचे ते म्हणाले आहेत.



द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते उदयनिधी, ए. राजा यांनी सनातन धर्माची बदनामी केली. त्या धर्माला त्यांनी डेंगी, मलेरिया, कोरोना, एचआयव्ही, कुष्ठरोग अशी नावे ठेवली, पण त्यानंतर तामिळनाडू सह देशभर प्रचंड प्रक्षोभ उसळला. स्टालिन सरकार अडचणीत आले.

तामिळनाडूत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तामिळनाडू विधानसभेची निवडणूक सनातन हिंदू धर्माच्या सन्मान आणि अपमानाच्या मुद्द्यावर लढवा, असे आव्हान अण्णामलाई यांनी स्टालिन यांना दिले.

हे पाहून स्टालिन यांच्या पायाखालची जमीन हादरली आणि त्यामुळेच त्यांना बॅकफूटवर येणे भाग पडले आणि त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारने तामिळनाडूतल्या मंदिरांसाठी कोणकोणती कामे केली, ती मोजायला सुरुवात केली.

तामिळनाडूत हिंदू मंदिरांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाने 1000 मंदिरांची दुरुस्ती करताना 650 कोटी रुपये खर्च केले. तेथे अभिषेक करवले. इतकेच नाहीतर राज्यातल्या विविध मंदिरांची 5000 कोटी रुपयांची संपत्ती त्या मंदिरांना परत केली. काशी विश्वनाथ मंदिरात देखील सरकारी अभिषेक केला, याची आठवण एम. के. स्टालिन यांनी करून दिली. यातून त्यांनी बूंदसे गेलेली अब्रू हौदाने भरायचा प्रयत्न केला.

1,000 temple consecrations done, believers laud govt, says Stalin

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात