प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने सुरू असताना राज्य सरकारने शासकीय कंत्राटी भर्तीचा जीआर काढला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील हजारो शासकीय पदे ही कंत्राटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार आहेत.Government Contract Recruitment; Government posts in 85 cadre will be filled through contract companies!!
महाराष्ट्रातील तब्बल 138 संवर्गातील हजारो शासकीय पदे यापुढे थेट कंत्राटीपद्धतीनेच भरली जाणार आहेत. यामध्ये शिपाई ते इंजिनीअरची विविध पदांचा समावेश आहे. यासाठी सरकार 9 खासगी कंपन्यांना सरळसेवा पदांच्या भर्तीची कंत्राटे देणार असल्याची माहिती आहे.
शासकीय भरती करणाऱ्या कंत्राटी
कंपन्यांना सरकार रितसर कमिशन देणार आहे. कंत्राटी भरती सुरळीत पार पाडावी यासाठी संबंधित खात्याचे मंत्री या भरतीवर लक्ष ठेवणार आहेत.
सर्वांसाठी खुली भरती
या कंत्राटी शासकीय भरती सर्वांसाठी खुली असणार आहेत. कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी कोणतेही आरक्षण लागू नसेल. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
याआधी काढलेला कंत्राटी भर्तीचा जीआर शासनाला रद्द करावा लागला होता. दरम्यान मराठा- ओबीसी आंदोलन पेटलेलं असतानाच शासनाने कंञाटी भर्तीचा जीआर काढला आहे. आता कंत्राटी भरती साठी सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भरती अंतर्गत कुशल पदांसह तब्बल 138 संवर्गातील पदं यापुढे कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी कंपनीला दर महिन्याला 15 % सेवा शुल्क मिळेल. कर्मचाऱ्यांचे पगारदेखील कंपनीद्वारे होतील. या 9 कंपनीद्वारे राज्य शासनाचे शासकीय विभाग /निम शासकीय विभागन स्थानिक स्वराज्य संस्था/ महामंडळे/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर आस्थापन इत्यादी यांना बंधनकारक राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची ही भरती 5 वर्षांसाठी असणार आहे.
अतिकुशल कामगारांच्या 70 जागा भरल्या जाणार असून यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून उच्च शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25000 ते 2,50000 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. कुशल कामगारांच्या 50 रिक्त जागा भरल्या जाणार असून उच्च शिक्षण आणि संबंधित कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांना दरमहा 25000 ते 60000 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.
अर्धकुशल कामगारांच्या 8 रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 30000 ते 32500 रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे. अकुशल कामगारांच्या 10 जागा भरल्या जाणार असून यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25000 ते 29500 रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App