“द केरल स्टोरी”च्या स्क्रिनिंगमुळे केरळचे मुख्यमंत्री + केरळ काँग्रेसचा चडफडाट!!

विशेष प्रतिनिधी

तिरूअनंतपूरम : लव्ह जिहाद विरोधातील सिनेमा “द केरल स्टोरी”च्या स्क्रिनिंगमुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि केरळ काँग्रेसचा अक्षरशः चडफडाट झाला. ऐन लोकसभा निवडणुकीत या सिनेमाचा तरुणाईवर होऊन तरुणांचे मतदान आपल्या विरोधात जाण्याची भीती केरळमधल्या कम्युनिस्ट पक्षाला आणि काँग्रेसला वाटली आहे. The Kerala Story Screening Kerala Chief Minister Kerala Congress Upset

वास्तविक “द केरल स्टोरी” हा सिनेमा सुमारे वर्षभरापूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो सुपरहिट ठरला होता. त्यामुळे संपूर्ण देशभरात लव्ह जिहाद विरोधात वातावरण तयार झाले. परिणामी उत्तराखंड, कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदे तयार झाले. लोकसभा निवडणुकीदरम्यान केरळ मध्ये तसेच वातावरण तयार होण्याची भीती मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि केरळ काँग्रेसला वाटली.



 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर “द केरल स्टोरी” सिनेमा दूरदर्शनवर प्रदर्शित झाला. त्याला देखील पिनराई विजयन आणि काँग्रेसने विरोध केला होता. तो सिनेमा दूरदर्शन वर प्रदर्शित करण्याच्या विरोधात केरळची कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती, पण तरीही तो सिनेमा दूरदर्शनवर प्रदर्शित झालाच. त्या पाठोपाठ केरळच्या चर्चेसने देखील आपापल्या विभागांमध्ये स्क्रीनिंग केले.

त्यामुळे कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस यांचा जास्त चडफडाट झाला. केरळच्या सांस्कृतिक एकात्मतेच्या विरोधात चर्चेसनी मोहीम चालवण्याचा आरोप मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला. पण केरळच्या चर्चेसनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला जुमानले नाही.

The Kerala Story Screening Kerala Chief Minister Kerala Congress Upset

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात