विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येत रामजन्मभूमीवर राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली हे देशाचे खरे स्वातंत्र्य आहे. पौष शुक्ल द्वादशी हा दिवस प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे. कारण शतकानुषटके बाह्य आक्रमणे सहन करणाऱ्या भारताला याच दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राम मंदिराचे आंदोलन कोणाच्या विरोधात केले नव्हते, तर देशाच्या आत्मसन्मानाचा तो लढा होता, असे ते म्हणाले.
राम मंदिराची प्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी झाली मात्र हिंदू पंचांगानुसार त्या दिवशी पौष शुक्ल वादशी होती त्यामुळे राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन 11 जानेवारीला पौष शुक्ल द्वादशी या दिवशीच साजरा झाला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये डॉ. मोहन भागवत बोलत होते.
– डॉ. मोहन भागवत म्हणाले :
– राम मंदिराची प्रतिष्ठापना हे देशाचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे. कारण शतकातुशतके बाह्य आक्रमणे सहन करणाऱ्या भारताला या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले.
– देश स्वतःच्या पायावर उभा राहा आपल्या देशाने जगाला मार्ग दाखवावा यासाठी भारतात जागृती घडविण्यासाठी राम मंदिराचे आंदोलन उभे केले होते. ते कोणाच्या विरोधात नव्हते. त्यामुळेच प्रत्यक्ष राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी गेल्या वर्षी कोणता वाद झाला नाही.
– राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा दिवस इथून पुढे प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला जावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App