वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे. भारत शरीयतनुसार नाही तर संविधानानुसार चालणार आहे हे तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिला. तसेच ‘गजवा-ए-हिन्द’ का स्वप्न पाहाणाऱ्यांचे स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही, असे म्हंटले आहे. The dream of those who dream of ‘Gajwa-e-Hind’ will not be fulfilled till the Day of Judgment; Yogi’s tweet
कर्नाटकातील हिजाब वादामध्ये विद्यार्थ्यांचं समर्थन करणाऱ्यांना योगी यांनी टोला लगावला आहे. देशातील कारभार हा संविधानानुसारच चालणार आहे. आपण आपले धार्मिक विचार देश आणि येथील संस्थांवर लादू शकत नाही. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का?, तर नाही असं मला म्हणता येणार नाही.
लष्करामध्ये कोणालाही कोणताही पोशाख घालण्याची परवानगी देता येईल का? तशाच पद्धतीने शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे, असं योगी म्हणालेत. भारत शरीयतनुसार चालणार नाही तर संविधानानुसार चालणार आहे हे तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा योगींनी ट्विटरवरुन दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App