वृत्तसंस्था
चंडीगड : नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पंजाबमध्ये एक कॉमेडी शो बनली आहे, असे टीकास्त्र माजी केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी सोडले आहे. The Congress, led by Navjot Singh Sidhu, is a comedy show; Tikastra of Harasimrat Kaur Badal
केंद्र सरकारच्या अनेक योजना पंजाबमध्ये काँग्रेसने लागू केल्या नाहीत. ज्या लागू होत्या, त्याचा डेटा केंद्राला पोहोचू दिला नाही. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात स्थगित केली पण त्यानंतर राज्य सरकारने जनतेला आरोग्यासाठी पैसा दिला नाही, अशी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री बदलले तरी त्यांच्यातली गटबाजी आणि भांडणे संपलेली नाहीत. ते काय आमच्याशी विधानसभा निवडणूकीत टक्कर घेणार. सिध्दूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कॉमेडी शो बनल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Because of Navjot Singh Sidhu Congress Party has become a comedy show in Punjab. Amid all of their drama the common people of Punjab are being crushed. PMJAY was suspended in Punjab after the State didn't provide the payment: Shiromani Akali Dal leader Harsimrat K Badal (24.10) pic.twitter.com/gcK1XSWzRi — ANI (@ANI) October 24, 2021
Because of Navjot Singh Sidhu Congress Party has become a comedy show in Punjab. Amid all of their drama the common people of Punjab are being crushed. PMJAY was suspended in Punjab after the State didn't provide the payment: Shiromani Akali Dal leader Harsimrat K Badal (24.10) pic.twitter.com/gcK1XSWzRi
— ANI (@ANI) October 24, 2021
पंजाबमध्ये काँग्रेस सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना स्थगित केली. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी आवश्यक डेटा केंद्र सरकारकडे पाठविलाच नाही. त्यामुळे बंगालमधले लाखो शेतकरी किसान सन्मान निधीपासून वंचित राहिले. असेच केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या बाबतीत झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App