शेतकरी कायदा रद्द करण्याचे विधेयक अक्षरश गोंधळा गोंधळामध्ये मंजूर करण्यात आले ; राज्यसभा खासदार जया बच्चन


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत बराच गोंधळ निर्माण झाला होता. गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी शेतकरी कायदे रद्द केल्याची घोषणा केली होती. हे कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक आज संसदेमध्ये मांडण्यात आले आणि ते मंजूरही करण्यात आले. लोकसभेत तसेच राज्यसभेतही कृषी विषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायदे मागे घेण्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे.

The bill to repeal the Farmers Act was passed in a literal mess; Rajya Sabha MP Jaya Bachchan

विरोधकांनी परस्पर कायदा मंजूर करून रद्द करण्याबाबत प्रचंड विरोध केला आहे. आणि सरकारच्या ह्या वागणुकीची निंदा देखील केली आहे. या सर्व गोष्टींवरुन संसदेमध्ये काही काळापुरता गोंधळ निर्माण झाला होता. यावर राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जया बच्चन म्हणतात की, आजवरच्या काळामध्ये मी पहिल्यांदाच अशा प्रकारचं वातावरण संसदेमध्ये पाहिले आहे. विधेयक अक्षरश गोंधळा गोंधळामध्ये मंजूर करण्यात आले आहे. आता असे वाटते की, विशेष संसद संरक्षण विधेयक देखील सादर करुन मंजूर केलं गेलं पाहिजे.


दहशतवादाविरुध्द लढ्याचे चिदंबरम, कपील सिब्बलांपासून जया बच्चनांना नाही गांभिर्य, संसदीय परराष्ट्र विषयक समितीच्या बैठकीस अनुपस्थित


पुढे त्या असंही म्हणतात की, संसदेमध्ये नागरिकांचे मृत्यू, अांदाेलन, वाढती महागाई या सर्व गोष्टींवर चर्चा व्हायला हव्या होत्या. पण सरकार काय करत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आपण कसं जगणार आहोत? पाणी प्रदूषण वाढले आहे, हवा प्रदूषित झाली आहे. आपण कसा जगणार आहोत? असा प्रश्न जया बच्चन यांनी यावेळी उपस्थित केला.

The bill to repeal the Farmers Act was passed in a literal mess; Rajya Sabha MP Jaya Bachchan

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात