विश्वचषक स्पर्धेत जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा जल्लोष, प्रथम ड्रेसिंग रूममध्ये आणि नंतर विमानात


वृत्तसंस्था

दुबई : टी २० क्रिकेट स्पर्धेत विश्वचषकावर मोहोर उमटविलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या विजयाचा आनंद जल्लोष करून साजरा केला. प्रथम ड्रेसिंग रूममध्ये आणि नंतर विमानात हा आनंदोत्सव साजरा केला. Team Australia ended their jinx at the T20 World Cup by lifting the title after they defeated rivals New Zealand in an epic final on Sunday

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी स्पर्धेतील अंतिम सामना झाला. त्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. विजयासाठी १७३ धवांचे आव्हान न्यूझीलंडने ठेवले होते. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी अप्रतिम अर्धशतके झळकावून स्पर्धेत एकूण आठव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन सुरू झाले. शॅम्पेन एकमेकांवर उडविले आणि टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये बिअर ओसंडून वाहत होती.
विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाने पाच मालिका गमावल्या होत्या, परंतु एकंदरीत चमकदार खेळाने सर्वाना मागे टाकले होते. विजय साजरा करणाऱ्या संघाची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली.



स्टीव्ह स्मिथने अॅडम झाम्पासोबत एक सेल्फी अपलोड केला आणि स्पर्धेदरम्यान त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले, तर ग्लेन मॅक्सवेल उत्सवादरम्यान स्की-गॉगल्स घातलेला दिसला. वेडने गॉगल घातला होता. गॉगल घालून खेळण्याची ती परंपरा आहे. जी प्रथम अमेरिकन खेळांमध्येसुरु झाली. शॅम्पेनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे खेळाडूच्या डोळ्यात पाणी येण्यापासून रोखण्यासाठी गॉगल घालतात. हीच कृती वेडने आनंद साजरा करताना केली.

दरम्यान, कर्णधार केन विल्यमसनच्या अवघ्या ४८ चेंडूत केलेल्या ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने आपल्या डावात १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कारण संघाने डावाच्या तिसऱ्या षटकात कर्णधार अॅरॉन फिंच (५ ) गमावला. मात्र, मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रतिआक्रमण करत अर्धशतकांसह डावाचा पुनरुत्थान करून करारावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलेला वॉर्नर ५३ धावांवर बाद झाला, परंतु मार्श नाबाद राहिला आणि त्याने आपल्या संघाला आरामशीरपणे विजय मिळवून दिला.

शूई म्हणजे काय?

बुटामधून मद्यपान करणे हे ऐतिहासिकदृष्ट्या चांगले नशीब आणणारे असल्याचे मानले जाते. २० व्या शतकाच्या सुरुवातीस लेडीज बूटमधून शॅम्पेन पिणे हे अधोगतीचे प्रतीक बनले.पण, ऑस्ट्रेलियामध्ये ही प्रथा विशेषतः लोकप्रिय आहे, जिथे तिला शूई म्हणतात.

Team Australia ended their jinx at the T20 World Cup by lifting the title after they defeated rivals New Zealand in an epic final on Sunday.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात