‘…तर १ कोटींचा दंड ठोठावू” म्हणत रामदेवबाबांचा पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाचा इशारा!

जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे? आणि न्यायालयाने आणखी काय म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. अॅलोपॅथिक औषधांबाबत पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर न्यायालयाने कंपनीला फैलावर घेतले आहे. Supreme Courts warning to Patanjali of Ramdev Baba then we will impose a fine of 1 crore

न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने पतंजलीला इशारा दिला की त्यांच्या उत्पादनांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या गेल्या तर त्यांना एक कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो.

न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला भविष्यात अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असा सल्ला दिला आहे. पतंजलीने प्रेसमध्ये अशी विधाने करण्यापासून दूर राहिले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.



यानंतर, न्यायालयाने निर्देश दिले की पतंजली आयुर्वेद भविष्यात अशी कोणतीही जाहिरात प्रकाशित करणार नाही आणि अशी आकस्मिक विधाने प्रेसमध्ये दिली जाणार नाहीत याची देखील काळजी घेईल. यासोबतच हा मुद्दा अ‍ॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा वाद होऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.

Supreme Courts warning to Patanjali of Ramdev Baba then we will impose a fine of 1 crore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात