वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण सोडून परतलेल्या आणि पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. इंटर्नशिपच्या ७.५ टक्के जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत.Students returning from Ukraine allowed internships; Fee waiver, entry from the exam
नॅशनल मेडिकल कमिशनने सांगितले की, युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची इंटर्नशिप पूर्ण करण्याची संधी दिली जात आहे. आतापर्यंत इंटर्नशिप फी फक्त दिल्लीत द्यावी लागत नव्हती. मात्र आता कोणत्याही राज्यात द्यावी लागणार नाही. इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट (FMGE) स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये सुमारे १८ हजार भारतीय आहेत. त्यांच्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांनी अर्धा अभ्यास सोडला आहे, तर काही असे आहेत की ज्यांना आपला सुरुवातीचा अभ्यास सोडून परत यावे लागले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग त्यांना भारतात संधी देत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more