Siddaramaiahs : ‘ED’च्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांच्या पत्नीने भूखंड परत करण्यास दाखवली तयारी

Siddaramaiahs

MUDAला पाठवले पत्र, जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे? Siddaramaiahs

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांनी MUDA ला पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीला (MUDA) भूखंड परत करणार असल्याचे म्हटले आहे. सिद्धरामय्या यांच्या पत्नीने MUDA आयुक्तांना पत्र लिहून त्यांना वाटप करण्यात आलेले 14 भूखंड सरेंडर करत असल्याचे सांगितले. पार्वती म्हणाल्या की त्यांना त्यांच्या 3 एकर आणि 16 गुंठे जमिनीच्या बदल्यात वेगळ्या ठिकाणी दिलेले 14 भूखंड परत करायचे आहेत.

त्यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘मी भूखंडांचा ताबा म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंटला परत देत आहे. कृपया MUDA ने लवकरात लवकर याबाबत आवश्यक पावले उचलावीत.’ वास्तविक, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात ईडीने गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकायुक्तांच्या एफआयआरची दखल घेत ईडीने MUDA प्रकरणात मुख्यमंत्री, त्यांची पत्नी पार्वती आणि इतर काही जणांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.



कर्नाटक उच्च न्यायालयाने MUDAद्वारे पार्वतीला 14 भूखंड वाटपातील अनियमिततेबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली मंजुरी कायम ठेवली होती. यानंतर बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने या प्रकरणाची लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले. लोकायुक्तांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, त्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवली आहेत. आता ईडीनेही या प्रकरणात प्रवेश केला आहे. ईडीने सिद्धरामय्या यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Siddaramaiahs wife showed readiness to return the plot

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात