विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांपूर्वीच पोस्टर्स वरती झाली “भावी” मुख्यमंत्र्यांची गर्दी; त्यात मनोज जरांगे ( manoj jarange ) यांचे नाव परस्पर जाहीर करून तिसऱ्या आघाडीने चुरस वाढवली!!Rajratna ambedkar
राजकीय कर्तृत्व कमी, तरी मुख्यमंत्री व्हायची हौस मोठी, अशी महाराष्ट्रातल्या नेत्यांची मनोवृत्ती असल्याने त्यांचे समर्थक दर वाढदिवसाच्या निमित्ताने आपापल्या नेत्यांची पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून झळकवतात. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवृत्तीच्या नेत्यांची संख्या मोठी आहे. पवार सोडले, तर राष्ट्रवादी प्रवृत्तीचा एकही नेता मुख्यमंत्री झालेला नाही. पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून नेते म्हणून मुख्यमंत्री झालेले नव्हते, तर ते अखंड काँग्रेसचे नेते म्हणूनच मुख्यमंत्री पदावर काँग्रेस हायकमांडने बसवलेले मुख्यमंत्री होते. पण म्हणून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स वर झळकायची दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची हौस काही भागत नाही.
अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे या सगळ्यांची नावे “भावी मुख्यमंत्री” म्हणून त्यांचे समर्थक नियमितपणे झळकवतात.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायच्या इच्छेनेच ते काँग्रेस हायकमांडला भेटून आले. पण तिथे त्यांची डाळ शिजली नाही.
या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या संघर्षात मध्ये घुसायचा प्रयत्न चालविलेल्या परिवर्तन महाशक्तीने म्हणजे तिसऱ्या आघाडीने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी परस्पर जाहीर करून टाकले. राजरत्न आंबेडकर यांनी हे काम केले. त्यामुळे मनोज जरांगे यांची पोस्टर्स वरच्या मुख्यमंत्र्यांशी स्पर्धा सुरू झाली.
मनोज जरांगे यांना महायुतीला, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना हरवायचे आहे, हे पक्के आहे. पण जिंकून कोणाला आणायचे हे अजून जरांगे यांचे ठरलेले नाही. म्हणजे किमान त्यांनी ते जाहीर तरी केलेले नाही. त्यांच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचे “उघड गुपित” सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे राजरत्न आंबेडकर यांनी जरी जरांगेंचे नाव “भावी मुख्यमंत्री” म्हणून जाहीर केले असले, तरी त्यांचे मास्टरमाईंड जरांगेंना ती ऑफर स्वीकारू देतीलच, याची कुठलीही गॅरंटी नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more