प्रेशर कुकरमध्ये पॅक केलेली स्फोटके नक्षलवाद्यांनी मातीखाली लपवून ठेवली होती
विशेष प्रतिनिधी
नारायणपूर : नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये ( Chhattisgarh ) सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला हाणून पाडला. नारायणपूर जिल्ह्यात पेरलेले तीन आयईडी सुरक्षा दलांनी जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. कच्च्या रस्त्यावर ही इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) मातीच्या आत पेरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली
अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी कस्तुरमेट्टा-मोहंडी गावांच्या रस्त्यावर होकपड गावाजवळ ५ किलो वजनाचा आयईडी आढळून आला. जिल्हा दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 53 व्या बटालियनचे संयुक्त पथक गस्त घालत असताना आयईडी आढळून आला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रेशर कुकरमध्ये पॅक केलेली स्फोटके नक्षलवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विरोधात वापरण्यासाठी मातीखाली लपवून ठेवली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला टळला.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कच्च्या रस्त्यावरून आयईडी जप्त केल्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने तो निकामी केला. नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवादी अनेकदा सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी अशी स्फोटके पेरतात. त्यामुळे अनेकदा सुरक्षा दलांचे मोठे नुकसान होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more